नेरळ मध्ये दुकानाशेजारी उभा असलेला टेम्पो गेला चोरीला

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


नेरळ मध्ये दुकानाशेजारी उभा असलेला टेम्पो गेला चोरीला

कर्जत,ता.4 गणेश पवार

                   कर्जत तालुक्यात वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.वाहन चोरीच्या दररोजच्या प्रतापामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

                     तालुक्यातील नेरळ येथे एक मालवाहू अशोक लेलॅन्ड या कंपनीचा टेंपो चोरीला गेल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.मुकेश कटारिया यांच्या मालकीचा असलेला हा टेम्पो अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याने कटारिया यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.मिळालेल्या माहिती नुसार कटारिया यांच्या मालकीचा असलेला मालवाहू एमएच 46 बी एफ 3797 या क्रमाकांचा टेम्पो नेरळ मुख्य बाजारपेठत असलेल्या अंबिकानाका दुकाना शेजरी रस्त्यावर नेहमी प्रमाणे पार्क केला होता.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेलेल्या कटारिया यांना आपला टेम्पो समोर दिसून न आल्याने कटारिया यांनी नेरळ पोलिसांना या बाबत माहिती दिली. 

                  व्यवसायाने व्यापारी असलेले मुकेश कटारिया यांनी दोन वर्षापूर्वी अशोक लेलॅन्ड या कंपनीचा टेम्पो मालवाहतुकीसाठी खरेदी केला होता.आजपर्यंत कर्जत तालुक्यात वाहनाचे किमती सामान तसेच मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र प्रसार माध्यमातून समोर येत होते.परंतु आता चोर  चारचाकी वाहनचं पळवून नेत असल्याचे समोर येत असल्याने वाहन मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.सध्या कर्जत तालुक्यात घरासमोरील-सोसायटी तसेच सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली वाहने चोरट्यांचे लक्ष ठरत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून,शहरातील पोलिसांनी ग्रामपंचायत हद्दीत तसेच मोक्याच्या ठिकाणी व्यापारी वर्गाने सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले आहे.

Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*