कामावरून घरी जाणार्‍या तरुणीचे अपहरण करून बलात्कार......

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


⭕ कामावरून घरी जाणार्‍या तरुणीचे अपहरण करून बलात्कार......

 

पुणे -:महिला अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच पुण्यात अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

 पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणी रात्रीच्या सुमारास कॉल सेंटरमधील ड्युटी संपल्यानंतर घरी जात होती. 

एका तरूणाने तिचे अपहरण केले. 

नंतर तिच्यावर बलात्कार केला. 

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे.

 ती  रात्री काम झाल्यानंतर घरी जात होती.

 त्यावेळी एका तरूणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

 काही वेळानंतर त्याने तिला गाठत मारहाण केली.

 नंतर बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि खराडीतील एका ठिकाणी घेऊन गेला. 

तिथे तरुणीवर आरोपीनं बलात्कार केला.

 त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या तरुणीला येरवडा येथील गुंजन चौकात आणून सोडले. झालेल्या घटनेनं तरुणी हादरून गेली.

 त्याच अवस्थेत तरुणीने तात्काळ घडलेली घटना मित्राला फोन करून सांगितली.

 त्यानंतर पीडित तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानुसार तक्रार दाखल करून घेतली. 

घटना घडलेल्या त्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. 

त्यात आरोपीची ओळख पटली. 

सी.सी.टी.व्ही.च्या मदतीने आरोपीला काही तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले.

 काही दिवसांपूर्वीच अशीच एक हादरवून टाकणारी घटना शहरात घडली होती. 

एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीसोबतच तीन नराधमांनी क्रूर कृत्य केलं होतं. 

पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता अपहरण करण्यात आलं होतं.

Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image