पुणे प्रवाह न्यूज पोर्टल
*शिवसेनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*
==============================
नायगांव :- *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी. जयंती निमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव ता. खंडाळा याठिकाणी शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने विजय डाकले , किशोर वचकल , उमेश म्हात्रे यांनी "सेवाव्रताची क्रांतीज्योती" हे पुस्तक देवुन सर्व पदाधिकार्यांचे स्वागत केले. व "व्हिजन डाँक्युमेंट २०२१" याविषयी माहिती दिली. यावेळी शिवसेना कराड उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी सावित्रीबाई रहात असलेला फुलेवाडा व सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टिची पाहणी करून समाधान व्यक्त केले.*
*यावेळी "सावित्रीबाई फुले स्मारक समिती व्हिजन" नायगाव चे अध्यक्ष विजय डाकले , समतापरिषद पुणे अध्यक्ष किशोर वचकल , युवासेना दौंड प्रमुख उमेश म्हेत्रे , शिवसेना कराड उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव , विभाग प्रमुख निलेश पारखे , शाखा प्रमुख कृष्णाजी बोडरे , सचिन थोरात , बाबू नाईक , पंकज जाधव , निलेश डुबल व शिवसैनिक उपस्थित होते.*