खडकी कॅन्टोंमेंन्ट बोर्डाच्या उपाध्यक्ष पदी कार्तिकी हिवरकर यांची निवड झाली

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


खडकी कॅन्टोंमेंन्ट बोर्डाच्या उपाध्यक्ष पदी कार्तिकी हिवरकर  यांचीनिवड झाली

*पुणे :-* खडकी छावणी सदस्या कार्तिकी हिवरकर यांची खडकी छावणी बोर्डाच्या पहिल्या  महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.कार्तिक हिवरकर आणि पूजा आनंद यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला. बोर्डाचे उपाध्यक्ष ठरविण्यासाठी  विशेष सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. उपाध्यक्ष पदासाठी कार्तिकी हिवरकर  आणि पुजा आनंद यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला. बोर्डाचे उपाध्यक्ष ठरविण्या साठी मतदान घेण्याचे स्पष्ट करण्यात आले. ४:३ मताने उपाध्यक्ष पदाची माळ हिवरकर यांच्या गळ्यात पडली. बोर्डाच्या इतिहासामध्येसर्वप्रथम महिला उपाध्यक्ष होण्याचा मान कार्तिक हिवरकर यांना मिळाला आहे. हिवरकर यांच्या उपाध्यक्ष पदामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले. बैठकीत खासदार गिरीश बापट, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह व बोर्डाचे सदस्य उपस्थित होते.