द महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आहेरकर यांची निवड.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- द महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आहेरकर यांची निवड करण्यात आली.संघटनेच्या यादव व्यापार भवन शिवाजीरस्ता येथील मुख्यालयात झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.उपाध्यक्षपदी मनोज चितळीकर,सचिव स्वप्नील शहा,सहसचिव उमेश दांगट,खजिनदार प्रसाद देशपांडे यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी माजी अध्यक्ष ब्रिजमोहन शर्मा,नरेंद्र सोनवणे आदी मान्यवरांच्या बरोबरच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.याच सभेत संघटनेचे नाव पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना. ऐवजी “द महाराष्ट्र कर सल्लागार संघटना” असे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.  


छायाचित्र : विलास आहेरकर.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या