स्टार प्रवाहवर नवनवी सरप्राईजेस पाहाण्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



शिवानी रांगोळेचं नवं मिशन


मुंबई :- ‘सांग तू आहेस का’ मालिकेतील भूमिकेसाठी शिवानी शिकतेय दुचाकी


अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे. या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप मदत केली. मालिकेत मी वैभवी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दुचाकीवरचे बरेचसे सीन असल्यामुळे मी दुचाकी चालवायला शिकायचं ठरवलं. सेटवर वेळ मिळाला की माझा सराव सुरु असतो. मला खूप आनंदही होतोय की भूमिकेच्या निमित्ताने मला नवी गोष्ट शिकता आली.’


हॉरर आणि रोमान्स असा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेतल्या शिवानीच्या नव्या लूकचीही चर्चा आहे. त्यामुळे अशीच नवनवी सरप्राईजेस पाहाण्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या