स्वरराज -सँड आर्ट मेमोरिअर ऑन राज ठाकरे' चे डिजिटल अनावरण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


स्वरराज -सँड आर्ट मेमोरिअर ऑन राज ठाकरे' चे डिजिटल अनावरण


पुणे :रचना शहा, रिदम वाघोलीकर आणि सुजित गिरकर प्रस्तुत 'स्वरराज -सँड आर्ट मेमोरिअर ऑन राज ठाकरे' चे दिनांक ५ डिसेंबर, शनिवार रोजी पुण्यात सायंकाळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनावरण झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे विविध पैलू सँड आर्टच्या माध्यमातून उलघडणारी अशी ही विशेष ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे, अशी माहिती रिदम वाघोलीकर यांनी दिली.


ही सँड आर्ट लता मंगेशकर यांची भाची रचना खडीकर - शहा आणि लेखक रिदम वाघोलीकर या जोडीच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. व्यावसायिक सुजित गिरकर यांनी दिग्दर्शन केले आहे, तर सँड आर्टिस्ट प्रसाद सोनावणे यांनी सँड आर्ट सादर केले आहे.


'आपल्या फेसबुक पेजच्या वाचक वर्गाला काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने रचना-रिदम ही लेखक जोडी सतत नवीन काहीतरी देण्यास उत्सुक असते. या सँड आर्ट बाबत बोलताना वाघोलीकर म्हणाले, 'दिग्गज संगीतकार, गायक, मनोरंजन, बॉलिवूड, कला, संगीत, संस्कृती यावर लिहून आपल्या वाचकांचे मनोरंजन करत आहेत. 'सँड आर्ट' माध्यम वापरून एखाद्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दर्शविण्यासाठी आणि त्यात जिवंतपणा आणण्यासाठी उपयोग होतो. तेव्हा कथानक जिवंत होते. यावेळी आम्ही राज ठाकरे यांची निवड केली. राजकारणात नेहमीच आपली वेगळी छाप सोडणारे आणि लक्षवेधी नेते असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कायमच वेगळेपण समाजापुढे मांडतात. एक कलाकार असल्याने त्यांचे संगीतावरील प्रेम खूप मोठे आहे. त्यांचे कुटुंब, तत्वज्ञान, मार्गदर्शक, पाळीव प्राणी, मैदानी खेळ आणि राजकीय प्रवास यावरचे त्यांचे प्रेम या बाबी 'स्वरराज -सँड आर्ट मेमोरिअर ऑन -राज ठाकरे' मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आम्ही त्यांचा जीवन प्रवास या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.' 


नुकतीच रचना- रिदम यांनी गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास उलगडणारी 'स्वरलता -एक अलौकीक गाथा ही सँड आर्ट बायोग्राफी' प्रदर्शित केली आहे. याचे लता मंगेशकर आणि त्यांच्या चाहत्यांनी जागतिक पातळीवर सर्वत्र कौतुक केले. 'स्वरराज - सँड आर्ट मेमोरिअर ऑन राज ठाकरे' या सँड आर्ट चे राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.