वर्षाअखेरीस गायिका 'सावनी रविंद्र' चाहत्यांना देणारं सांगितीक भेट

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


वर्षाअखेरीस गायिका 'सावनी रविंद्र' चाहत्यांना देणारं सांगितीक भेट

पुणे :- आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे 'सावनी रविंद्र'. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती. सावनी सोशल मिडीयावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. शिवाय तिने इंस्टाग्रामवर २५० के फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक सांगितीक भेट देणार आहे. याविषयी ती म्हणते, ''२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवटं गोडं करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन मॅशअप गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल. तसेच मी माझ्या युट्यूुब चॅनेलवरून दर महिन्यातून एकदा लाईव्ह जॅमिंग सेशन सुरू करणार आहे. जेणेकरून माझं चाहत्यांप्रतीचं प्रेमं मी व्यक्तं करू शकेन.''

गायिका सावनी रविंद्र तिच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस कोणतं नवं गाणं घेऊन येत आहे. हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेलं.

Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image