गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


प्रेस नोट



'गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज '

................


' संकुल सुविधा ' आयोजित संवाद कार्यक्रमातील सूर

....................... 

गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ



पुणे :



शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत असताना, विविध सेवांची गरज तयार होत आहे. या समस्या, अडचणी सोडविण्यास गृहनिर्माण संस्थांना वेळ अपुरा पडतो.गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. तरुण पिढीने त्यात पुढाकार घेतला पाहिजे' असा सूर ' संकुल सुविधा ' आयोजित संवाद कार्यक्रमात उमटला.


गृहनिर्माण संस्थांसाठी सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा देणाऱ्या ' संकुल सुविधा ' या हेल्पलाईनचा प्रारंभ रविवारी बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड , पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या हस्ते झाला. यावेळी ' गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने ' या विषयावरील संवाद कार्यक्रमात मान्यवरांनी मते मांडली.


बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे सिंहगड रस्ता विभाग अध्यक्ष समीर रुपदे,रोटरी क्लब च्या सेवा विभागाचे संचालक अभय जोशी,डॉ विवेक येळगावकर ,शंतनू येळगावकर या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले. 

 

 

हणमंत गायकवाड म्हणाले, ' सेवा क्षेत्रात कामाच्या चांगल्या संधी आहेत.सेवा क्षेत्रात काम करताना आपण बरे किंवा उत्तम असून चालत नाही, सर्वोत्तम असावे लागते. या क्षेत्रात काम करताना आधुनिकतेचा वसा घ्या. कारण पुढील काळात स्वच्छता करण्याचे काम रोबो करेल. तसेच सरकारी नियमांमध्ये आता पळवाट काढता येत नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.


सुहास पटवर्धन म्हणाले, ' पुणे जिल्ह्यात १८ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्थांमध्ये अनेक कामे असतात, आव्हाने असतात. त्या सोडवताना सातत्य, सचोटी ठेवली पाहिजे '.


समीर रुपदे म्हणाले, ' गृहनिर्माण संस्थांच्या कामात वादविवाद टाळायचे असतील, तर, तरुण पिढीने जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत '.


या संवाद कार्यक्रमात प्रास्ताविक करताना शंतनू येळगावकर म्हणाले, 'गृहनिर्माण संस्थांच्या संचालनात अनेक अडचणी येत असतात. त्या सोडवण्याच्या ध्येयाने, चांगल्या सेवा -सुविधा देत कार्यरत राहू.


 स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अभय जोशी, डॉ. विवेक येळगावकर, समीर रुपदे व्यासपिठावर उपस्थित होते.दशरथ कुऱ्हाडकर, महेश भुरे, सुधीर कुऱ्हाडकर यांनी स्वागत आणि संयोजन केले. रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम कै. ज्ञानेश्वर नरहरे सभागृह , प्रेस्टीज पॉईंट, सदाशिव पेठ, पुणे येथे झाला.'संकुल सुविधा' मार्फत गृहनिर्माण संस्थाना कायदेशीर सल्ला सेवा ,हाउसकीपिंग,सिक्युरिटी,गार्डनिंग,रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लम्बिंग,वॉटर प्रूफिंग,इलेक्ट्रिकल,पेस्ट कंट्रोल, सोलर अशा अनेक सेवा पुरविल्या जाणार आहेत.त्यासाठी ९१५६२१९८२९ या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. 


................................................