कोरोना महामारी संकटकाळाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरांत रक्तदान शिबिराचे आयोजन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल.


कोरोना महामारी संकटकाळाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरांत रक्तदान शिबिराचे आयोजन


सांगली वार्ताहर:

हिंदरत्न जीवनरक्षक मानव संस्था,सांगली आणि भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा,भारत. यांचे संयुक्त विद्यमाने तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज आणि देशभक्त आर.पी.पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय,कुपवाड.यांचे अनमोल सहकार्याने सांगलीशहरांत प्रथमच "रक्तदान शिबिर" आयोजित केले होते.

आपल्या देशावर ओढवलेलं कोरोना महामारीच संकट लक्षात घेता.रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज भासत आहे.एक आठवडा पुरेल एवढा रक्त साठा आपल्या महाराष्ट्र राज्यात शिल्लक आहे.हे संकट लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय मा.श्री अभिजित चौधरी साहेब यांचे रक्त संकलन करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून व आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण कांहीतरी देणं आहोत या न्यायाने एक खारीचा वाटा म्हणून हिंदरत्न जीवनरक्षक मानव संस्था,सांगली आणि भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा,भारत चे महाराष्ट्र राज्य प्रबंधक मा.श्री.दिपक लोंढे आणि परिवार सहकारी मित्रमंडळी यांचे पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला.

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी आमदार मा.श्री.शरद पाटील सर यांचे शुभ हस्ते झाले.रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे व उदघाटक या नात्याने मा.श्री.शरद पाटील सर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरोना महामारीच्या साथीने सर्व नागरिकांना जेरीस आणले आहे. अनेकांना अश्या ह्या कोरोना महामारीच्या संकटकाळात वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रासले आहे.त्यांना सामोरे जावं लागत आहे.अत्यावश्यक रक्त पुरवठा कमी पडत चालला आहे.आजच्या कोरोना महामारी संकटकाळात रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज भासू लागली आहे.अश्या ह्या बिकट परिस्थितीत मा.श्री.दिपक लोंढे आणि कुटुंबीय यांनी रक्तदान शिबिर सारखा अत्यंत मोलाचा सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे.आजअखेर रक्तदान शिबिर सारखेच इतर विविध उपक्रम व समाजसेवाकार्य करण्यात ते सतत सक्रिय असतात.ते त्यांनी यापुढेही असेच अविरतपणे अखंड चालू ठेवावे.श्री.लोंढे कुटुंबीय आणि सहकारी मित्रमंडळी हे राबवत असलेल्या पुढील समाजसेवेच्या विविध उपक्रमांना मा.श्री.शरद पाटिल सरांनी शुभेच्छा देत.दोन्ही संस्थेचे अभार मानले.

रक्तदान शिबिरास यशवंत शिक्षण संस्थेचे, देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयाचे मान्यवर सदस्य मंडळी व मा.मुख्याध्यापक उपस्थित होते.रक्तदान शिबिर कार्यक्रमची प्रस्तावना व रक्तदान शिबिरास आलेल्या विविध मान्यवर सर्व पाहुण्यांचे,रक्तदात्यांचे, पत्रकार बांधव,कार्यकर्ते व शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सांगली यांचे डॉक्टर,नर्सेस व स्टाफ चे अभार व कार्यक्रमची सांगता समाजरत्न मा.श्री.अशोक भाऊ पाटील कोकळेकर यांनी केली.

सदर रक्तदान शिबिर आयोजक प्रमुख हिंदरत्न जीवनरक्षक मानव संस्था,सांगलीच्या संचालिका सौ.शारदा लोंढे, भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा भारत ह्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक मा.श्री.दिपक लोंढे. महासचिव मा.श्री.विनय नांदे,उपमहासचिव सौ.रेखा माळी, विशेष सल्लागार व लेखक मा.श्री.शरद कुसनाळे सर, राष्ट्रीय खेळाडू मा.श्री.आर्यदिप लोंढे. पार्श्वनाथ बँकेचे मा.श्री.संदिप शहा समाजसेविका सौ.राजश्री शहा शिवप्रतिष्ठान चे युवा नेते मा.श्री.सुरज शहा,मा.श्री.गणेश पूजारी,मा.श्री.विकास कांबळे ह्या सर्व उपस्थितांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.रक्तदान शिबिरास ज्या ज्या इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे पुन्हा एकदा आभार.