पुणे प्रवाह न्युज पोर्टल
महाराष्ट्राचे मामु आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी काल विधानसभेत सांगितले की मविआ सरकार विरोधात बोलणारांना झेल मधे टाकले जातंय कोणाचे घर पाडले जातंय हे सरकार ठोकशाही ने काम करतंय.
देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं व भाजपच्या बाजूने जे मुद्दे आहेत तेवढेच बोलायचे ही भाजपची शिकवण असेल पण तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री असताना भाजपने २०१९ विधानसभा निवडणूक लागण्या अगोदर महाजनादेश यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना *धर्मा पाटील यांच्या ६० वर्षा वरील पत्नी , मनीषा काटे नावाची आमची भगीनी ज्यांना १ वर्षाचे तान्हे बाळ असताना नजर कैदेत ठेवले एवढ्यावर न थांबता कडकनाथ कोंबड्या घेऊन भाजपचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या युवकांच्या अंगावर तुम्ही स्वतः असलेली बस घालण्याचा प्रयत्न केला ते युवक थोडक्यात बचावले ही कुठली ठोकशाही होती हे पण काल विधानसभेत सांगितले असते तर बरे झाले असते.*
देवेंद्र फडणवीस जी संपूर्ण महाराष्ट्र महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना एका सभेत तर तुम्ही कहर च केला तुमचे भाषण चालू होत असताना दोन शेतकरी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून प्रश्न विचारत होते त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना उत्तर द्यायचे सोडून *हे असे दोन चार नमुने प्रत्येक सभेत असतात.* देवेंद्र जी एका बाजूला शेतकऱ्यांना नमुना म्हणता आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी विरोधात असलेले कायदे किती शेतकरी फायद्याचे आहेत हे सांगायला TV समोर येता ही दुटप्पी मांडूळा सारखी भूमिका भाजपने बदलणे गरजेचे आहे.
देवेंद्र जी तुमची मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षाची कारकीर्द जनतेसमोर मांडली तर तुम्ही स्वतःहून घराबाहेर पडणार नाही.
असो..........
*विशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक.*