*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*खासदार मा. डॉ. अमोल कोल्हे*
*सोनी मराठी वाहिनीवरील*
*स्वराज्यजननी जिजामाता, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला*
*पुणे :-* सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत.
आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.
ही मालिका लवकरच नव्या वळणावर असून,
खा. डॉ. अमोल कोल्हे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहण्याची संधी पुन्हा, सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेद्वारे मिळणार आहे.
स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.
पाहा महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, 'स्वराज्यजननी जिजामाता'! सोम.-शनि., रात्री ८:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.