पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
विजय दिनानिमित्त वीर पत्नी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार --------------- शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचा उपक्रम
पुणे :
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेतर्फे विजय दिनानिमित्त वीर पत्नी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.रविवारी सैनिक लॉन्स घोरपडी येथे हा कार्यक्रम सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल रा.रा.जाधव यांच्या हस्ते झाला.यावेळी दहा वीर पत्नींना भाऊ बीज भेट देण्यात आली.त्यात सोनाली फराटे,कुंदना आगवण,वनिता पवार,जयश्री शेळके,शीतल जगदाळे,निशा गलांडे,गीता सानप आदींचा समावेश होता. विजय दिनानिमित्त हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी प्रकाश भिलारे,दिलावर शादीवान,बाळासाहेब जाधव,निरंजन काकडे,रवींद्र शेवाळे,राजेंद्र गायकवाड,सुभाष सूर्यवंशी,विकास बर्गे,सचिन निगडे,विजय जाधव,अशोक गायकवाड,कैलास गवळी,रमेश मदुरे,राजेंद्र पंधारे,तारळकर,प्रशांत देवरे,विक्रम दिवटे,अमोल पोतदार,सचिन निगडे,रवींद्र पाटील उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांच्या प्रश्नांची चर्चा करण्यात आली. --------------------