उपमहापौर पदासाठी सुनिता वाडेकरांचे नाव आघाडीवर

 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* उपमहापौर पदासाठी सुनिता वाडेकरांचे नाव आघाडीवर 


*पुणे, ता. १३ :-* पुणे महापालिकेतील सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी भाजपने सभागृह नेता बदलल्यानंतर, आता उपमहापौर ही बदलण्यात येणार आहे. नव्या उपमहापौर म्हणून बोपोडी प्रभाग क्रमांक ०८ च्या नगरसेविका सुनीता वाडेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, या पदाच्या निवडीचा प्रक्रिया पुढील चार दिवसांत होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरपदावर भाजप, तर उपमहापौरपद हे मित्रपक्ष असलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे (आरपीआय-आठवले गट) आहे. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे हे उपमहापौर होते. त्यानंतर सध्या सरस्वती शेंडगे या उपमहापौर आहेत. मात्र, महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने बदल करीत, सभागृहनेता बदला. त्यानंतर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या मात्र महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन केलेल्या आरपीआयनेही पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत विद्यमान 'आरपीआयच्या गटनेत्या वापर सुनीता वाडेकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. बोपोडी प्रभाग क्रमांक ०८ च्या नगरसेविका सौ. सुनीताताई परशुराम वाडेकर येणाऱ्या काळात उपमहापौर ची माळ गळ्यात पडण्याची जास्त शक्‍यता आहे. 

परंतु उपमहापौर होण्याआधी सोशल मीडियावर ताईंना शुभेच्छा देणाऱ्यांचा भडीमार पाहावयास मिळत आहे.

Popular posts
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी.
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
डीजिटल हब चा वापर करुन लवळे येथिल भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हर्चुअल क्लास द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
Image
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे  ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन
मदतीचा हात म्हणून मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्था ला गरजू गाेरगरिब नागरिकाना रेशनिंग किट वाटप
Image