पोस्टमन काठे यांना कोरोना योध्दा सन्मान 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


----------------कृपया प्रसिद्धी करीता------------


पोस्टमन काठे यांना कोरोना योध्दा सन्मान 


पुणे :- जी.पी.ओ.: कर्तव्य फाउंडेशनतर्फे लष्कर भागात कार्यरत असलेले पोस्टमन हनुमंत काठे यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव करण्यात आला. जी.पी.ओ.येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पुणे प्रधान डाकघरचे वरिष्ठ पोस्ट मास्तर बी.पी.एरंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व कार्याध्यक्ष अशोक देशमुख यांच्याहस्ते श्री.काठे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.


हनुमंत काठे हे गेली अनेक वर्षांपासून लष्कर भागात पोस्टमन पदी आपले कर्तव्य बजावत असून कोरोना संसर्ग लाँकडाऊन काळातही त्यांनी अविरतपणे आपले कर्तव्य बजावले असल्याने त्यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव केला असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी सांगितले.वरिष्ठ पोस्ट मास्तर बी.पी.एरंडे यांनी पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले व हनुमंत कोठे यांची दखल घेतल्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनचे आभार मानले.


विकास भांबुरे,अध्यक्ष-कर्तव्य फाउंडेशन