कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन जिल्हयात मतदानास सुरुवात... जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन*


*जिल्हयात मतदानास सुरुवात*


  *... जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख*


पुणे, दि.1 (जि.मा.का.) :- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदानास सुरवात झाली. कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सुविधा आदि आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 


   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात मतदान केंद्र परिसरात प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या साहित्याचे कीट पुरविण्यात आले आहे. मतदानासाठी येणा-या मतदारांमध्ये देखील सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच केंद्रावर येणा-या मतदारांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदार सहायक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व सहायकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.


00000


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image