सांग तू आहेस का’ मालिकेतील शिवानी रांगोळेचा नवा लूक लक्ष वेधणारा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सांग तू आहेस का’ मालिकेतील शिवानी रांगोळेचा नवा लूक लक्ष वेधणारा


रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारल्यानंतर आता दिसणार वैदेहीच्या रुपात


स्टार प्रवाहवर ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या मालिकेमधून शिवानी रांगोळे एका हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेही असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून या लूकसाठी शिवानीने केलेला मेकओव्हर सध्या चर्चेत आहे. शॉर्ट हेअर आणि शिवानीचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. शिवानी रमाबाईंची भूमिका खऱ्या अर्थाने जगली. त्यामुळे नव्या भूमिकेसाठी सज्ज होताना तीने मेकओव्हर करण्याचं ठरवलं.


लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘रमाबाईंची भूमिका खूपच वेगळी होती. मालिकेची सांगता झाल्यानंतर सांग तू आहेस का मधील वैदेहीच्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मी लूक चेंज केला. लूक चेंज केल्यानंतर ती व्यक्तिरेखा सापडायला मदत होते असं मला वाटतं. वैदेही ही व्यक्तिरेखासुद्धा खूपच वेगळी आहे. प्रोमोमध्ये दिसणारा थ्रीलरचा फील प्रत्येक एपिसोडमध्ये जपला जाणार आहे. विशेष म्हणजे ही एक रोमॅण्टिक स्टोरी सुद्धा आहे. त्यामुळे मला काम करताना खूप छान वाटतं आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस’ का ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर