क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांनी आपल्या आई वडिल आणि पुणे, पिंपरी - चिंचवड उद्यम नगरीचे नाव लैवकींक केले याबद्दल  ऋतुराजचे 'कौतुक करावे तेवढे थोडे आहे.  असे गौरवोद्गार पिंपरी - चिंचवड महापौर* उषा उर्फ माई ढोरे यांनी काढले. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड


यांनी आपल्या आई वडिल आणि पुणे, पिंपरी - चिंचवड उद्यम नगरीचे नाव लैवकींक केले याबद्दल  ऋतुराजचे 'कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 


असे गौरवोद्गार पिंपरी - चिंचवड महापौर*


उषा उर्फ माई ढोरे यांनी काढले. 


पिंपरी : - आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा रहिवासी आहे. त्याने आयनीएलमध्ये तीन अर्धशतक झळकावत केलेल्या यशस्वी खेळाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. ऋतुराज हा आपल्या शहरातील रहिवासी असल्याने महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराजच्या पालकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. 


आयपीएल सामन्यामध्ये २३ वर्षीय ऋतुराजने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावले. आपली वेगळी छाप त्याने आयपीएलमध्ये पाडली आहे. चांगली कामगिरी केल्याने सचिन तेंडुलकर, चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही त्याचे कौतुक केले.


जुनी सांगवीमध्ये गेली अनेक वर्षे राहत असल्याने महापौर माई ढोरे यांनी सातत्याने खेळाडू म्हणून ऋतुराजला प्रोत्साहन दिले असल्याचे पालकांनी सांगितले. आयपीएल मधील त्याचा खेळ पाहून महापौरांनी त्याच्या पालकांना शुभेच्छा भेट दिली. यावेळी महापौर माई ढोरे यांनी वडील श्री. दशरथ गायकवाड आणि आई सौ. सविता गायकवाड यांना भेट देत ऋतुराजचे कौतुक केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महापौरांसोबत नगरसेविका सौ.शारदा सोनावणे ,श्री.संतोष ढोरे,धनंजय ढोरे,हिरेण सोनवणे,भुषण शिंदे,जवाहर ढोरे,ओंकार स्वामी,यतीन शिंदे,अजय यादव आदी उपस्थित होते.


 उषा उर्फ माई ढोरे – महापौर (कोट)


ऋतुराजचे आपल्या शहरात कुटुंब जुनी सांगवी येथे गेली २० – २५ वर्षे वास्तव्यास आहे. खेळाडू म्हणून त्याला घरच्यांनी चांगली साथ दिली आहे. तसेच खेळासाठी त्याने सातत्याने घेतलेले केलेले कष्ट आम्ही पाहिले आहेत. आयपीएल मध्ये उत्तम कामगिरी करत त्याने आपल्या शहराचे आणि आई वडिल आणि पुणे पिंपरी - चिंचवड उद्यम नगरीचे नाव लैवकींक केल्याबद्दल करावे,तेवढे कौतुक थोडे आहे.,असे गौरवोद्गार पिंपरी - चिंचवड महापौर उषा उर्फ माईताई ढोरे यांनी काढले.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image