औंधगाव येथे एस एम एस ग्रुप ने प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *औंधगाव येथे एस एम एस ग्रुप ने प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली*


पुणे :- दिवाळी आली की फटाके वाजवून स्वागत केले जाते. फराळ तयार केला जातो.आकाशकंदील लावले जातात. परंतु हया वर्षी कोरोना च्या पाश्र्वभूमीवर कोरोना गर्दी ने व प्रदूषणाने वाढू नये म्हणून प्रदूषणाने कोरोना वाढू नये म्हणून प्रदूषणविरहित फटाके न वाजवता व *झाडे वाढवा!झाडे जगवा! प्रदूषण टाळा! कोरोना घालवा.* अशी दिवाळी *एस एम एस ग्रुप च्या *सोनल सराफ (सामाजिक कार्यकर्ता) औंध यांनी केली.हे त्यांचं ५ वे प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे वर्ष आहे. हे त्यांनी वर्ष २०१५ पासून *एक झाड एक सोसायटी* हया उपक्रमा द्वारे सुरूवात केली हि सुरूवात त्यांनी औंध येथील वायरलेस काॅलनी काॅ. हौसिंग सोसायटी पासून केली होती. हया वर्षी हया सोसायटीचे ५०वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.हया वेळी सोनल (गोटू) सराफ यांनी हयाच 


सोसायटीत वर्ष २०१५ सारी लावलेल्या झाडा बरोबर त्याला आकाश कंदील लावून व झाडा खाली दिप लावून ५ वर्षाच्या व २०ते २५फूट उंच झालेल्या झाडा बरोबर फटाके न वाजवता सर्वांना शुभेच्छा देऊन दिवाळीचा भाऊबीज व पाडवा साजरा केला. व पाचव्या वर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली. हया द्वारे त्यांनी एक संदेश सर्वांना दिला आहे की झाडे लावून झाडे लावण्याचा संकल्प पूरा होत नाही , तर लावलेल्या झाडांना पाणी मिळेल अशा ठिकाणी लावून झाडे वाढून झाडे जगवली पाहिजे.व पाऊस देणा-या . प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करणा-या व आॅक्सिजन देणा-या व कार्बन चे कमी करणा-या आपल्या मित्र असणा-या झाडाबरोबर दिवाळी साजरी करून प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करावी, असा सोनल सराफ संदेश देत आहे.व कोरोना च्या काळात समाजातील व्यक्तिला आॅक्सिजनची गरज खुप लागते ‌. हया प्रकारे सोनल सराफ यांनी अशा प्रकारे हया वर्षी कोरोना च्या पाश्र्वभूमीवर प्रदुषण मुक्त दिवाळी झाडा बरोबर दिवाळी साजरी केली आहे.फटाके न वाजवता साजरी केली.