दयाबेनची जागा आता महाराष्ट्राची लाडकी डान्सर आणि कोरिओग्राफर ऋतुजा जुन्नरकर ही साकारणार आहे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल**पुणे :-* तारक मेहतात येणार नवीन दयाबेन; जुन्या दयाबेनपेक्षा प्रचंड सुंदर आणि स्टाईलिश आहे ही


लहान मुलांपासुन ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांचीच आवडती मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीचे आहे. पण प्रेक्षकांकडून जेठालाल आणि दयाबेन यांना विशेष प्रेम मिळाले. पण ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वकानी ३ वर्ष दिसली नाही आहे. आता दिशा वकानी म्हणजेच दयाबेनची जागा आता महाराष्ट्राची लाडकी डान्सर आणि कोरिओग्राफर ऋतुजा जुन्नरकर ही साकारणार आहे. 


त्याचं झालं असं की, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ची संपूर्ण टीम इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये पोहोचली होती. यावेळी कोरिओग्राफर ऋतुजा जुन्नरकर हिने दयाबेनची भूमिका करत डान्स परफॉरमन्स केला. यामध्ये ती जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांना ‘टप्पू के पापा’ म्हणून देखील हाक मारते. तिचा हा परफॉरमन्स सर्वांनाच आवडला. ऋतुजाला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये पाठवा अशी गंमतीशीर मागणी शोच्या निर्मात्यांनी केली.


आता तिची एंट्री तारक मेहता शोमध्ये होणार आहे. आणि या शोमध्ये ती दयाबेनची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. ऋतुजाने इंडियाज बेस्ट टैलेंट मध्ये डान्स करून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बरेच लोक असेही म्हणतात की तारक मेहता मध्ये दिसणारी हि नवीन अभिनेत्री पहिल्या दयाबेन पेक्षा सुंदर आणि स्टाईलिश आहे.


ऋतुजा म्हणाली की “दयाबेन होणे सोपे नव्हते. जेव्हा मला कळले की मला दयाबेन होण्याची संधी मिळत आहे, तेव्हा मी प्रथम चिंताग्रस्त होते कारण हे पात्र इतके मूर्तिमंत आणि इतके मोठे आहे की ही भूमिका करणे खूप कठीण आहे.”


“तालीमच्या पहिल्या दिवशी मी रडत होतो. त्यांची कॉपी करणे शक्य नव्हते. पण माझ्या नृत्यदिग्दर्शकाने मला समजावून सांगितले की तु हे करू शकतेस, त्यानंतर मी त्यांचे बरेच पाहिले, मग मी विचार केला काय होईल ते पाहू. आणि मी डान्स केला. आणि त्याचा परिणाम चांगला झाला.” असे ऋतुजा म्हणाली.