काँग्रेस पर्यावरण विभागाच्यावतीने मा. सरदार वल्लभाई पटेल व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना आदरांजली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल " काँग्रेस पर्यावरण विभागाच्यावतीने मा. सरदार वल्लभाई पटेल व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना आदरांजली "


आज दि. ३१/१०/२०२० रोजी मा. सरदार वल्लभाई पटेल यांची १४५ वी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची ३६ वी पुण्यतिथी निम्मित काँग्रेस पर्यावरण विभाग व पिं. चिं. युवक काँग्रेस यांच्या वतीने आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस श्री. अशोक मोरे (अध्यक्ष, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस) व अशोक मंगल (महासचिव,पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ) यांनी तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस श्री.नरेंद्र बनसोडे (अध्यक्ष, पिं. चिं. युवा काँग्रेस ) यांनी पुषहार अपर्ण केले. सर्वानी मिळून राष्ट्रीय एकात्मतेची आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. हा कार्यक्रम पर्यावरण विभाग कार्यालय अजमेरा मध्ये संपन्न झाला.


आदरांजली कार्यक्रमास पुढील कार्यकर्ते उपस्थित होते.


अशोक मोरे (अध्यक्ष, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस), अशोक मंगल (महासचिव,पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ), नरेंद्र बनसोडे (अध्यक्ष, पिं. चिं. युवक काँग्रेस ) , हिरा जाधव (अध्यक्ष, पिंपरी विधानसभा क्ष्रेत्र युवक काँग्रेस) , नासिर चौधरी (अध्यक्ष, भोसरी विधानसभा क्ष्रेत्र युवक काँग्रेस) , उमेश खंदारे (एन एस यु आई प्रदेश उपाध्यक्ष) तसेच पर्यावरण विभागाचे कार्यकर्ते राजेश नायर, मिताली चकवर्ती, जयश्री कननाईके उपस्थित होते