लष्कर पो. ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांचे कर्तव्य फाउंडेशनतर्फे स्वागत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल ---------------कृपया प्रसिद्धी करीता---------


लष्कर पो. ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांचे कर्तव्य फाउंडेशनतर्फे स्वागत


कॅम्प पुणे: लष्कर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम साहेब यांचे कर्तव्य फाउंडेशनतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख व ग्रंथपाल दिलीप भिकुले आदी उपस्थित होते.


यावेळी लष्कर भागातील विविध सामाजिक व नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी लष्कर भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.


विकास भांबुरे,कर्तव्य फाउंडेशन