*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*
पुणे :-डॉ. मुरलीधर तांबे*
अधिष्ठाता
ससून सर्वोपच्चार रुग्णालय
यांची या पदावर गेल्या काही महिन्यांपासून नियुक्ती झाली आहे . परंतु आज रोजी ही, डीन आॅफिसच्या बाहेरील नाम फलकावर मा. डॉ. अजय चंदनवाले यांच्या नावाचा फलक आज पर्यंत तसाच आहे. ही बाब वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मुन्नावर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली, शिवाजीनगर मतदार संघांचे शिष्टमंडळ ससून हाॕस्पिटल मध्ये काही कामानिमित्त निवेदन देण्यात गेले असता, सदरील बाब लक्षात आली.
ही बाब अतीशय चिंताजनक असून निंदनीय आहे.
ससून प्रशासन आणि महाराष्ट्र आरोग्य विभाग यांच्या गचाळ कारभारांचे दर्शन लक्षात आले.
नव्याने अधिष्ठाता पदावर रुजू झालेले डॉ. मुरलीधर तांबे यांच्या वर हा खुप मोठा अन्याय च म्हटला पाहिजे???
ससून प्रशासन असे कशी वागणूक, एवढया मोठया पदावर कार्यरत असणाऱ्यांशी वागणूक देऊ शकते. ही मोठी धक्कादायक माहिती समोर आल्याने, तसेच मा. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे कुठल्याही प्रकारचा राग किंवा वादविवाद नाहीत. हे प्रथमतः स्पष्ट करणे गरजेचे आणि आवश्यक आहे. उगीच गैरसमज नसावा .....
वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघा कडून त्याकरिता हा खुलासा...
त्यामुळे ससून आणि महाराष्ट्र आरोग्य प्रशासन एवढी मोठी चूक कशी करु शकते,हा कळीचा मुद्दा आणि महत्वाचा प्रश्न आहे. या दोन्ही प्रशासनाची चुक लक्षात आणुन देण्या करिता वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर 2020 रोजी, साधारण सायंकाळी सहाच्या सुमारास मा. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले याच्या नाम फलकांचे पाटी असणाऱ्या ठिकाणी, खालील भागात वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या शिष्टमंडळाने, कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी चा भंग न करता. कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित राखीत, शांततेच्या मार्गाने सध्या कार्यरत असणारे आणि पदावर नियुक्ती करण्यात आलेले आदरणीय डॉ. मुरलीधर तांबे अधिष्ठाता ससून हाॕस्पिटल, यांच्या नावाचे नाम फलकांचे अनावरण करुन, दोन्ही प्रशासनाच्या एवढी मोठी चुक लक्षात आणली.
यावेळी *मा. मुनोवर कुरेशी*
*वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष* , *यांच्या नेतृत्वाखाली*,
वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघाचे अध्यक्ष मा. रणजीत केदारी, फय्याज सय्यद (अध्यक्ष पुणे काॅन्टोमेंन्ट मंतदार संघ), मा. अजयभाऊ कोरके कायदेशीर सल्लागार (शि. म. संघ), विक्रांत बेंगळे महासचिव शि.म.संघ, मा. अशोक गायकवाड (शि. म. संघ), मा. महेंद्र येरेल्लु सहसंघटक (शि. म. संघ),मा. साजन सुर्यवंशी (अध्यक्ष खडकी विभाग )मा.दिक्षांत चव्हाण उपाध्यक्ष शि. म. संघ,
बशिर मुजावर उपाध्यक्ष शि. म. संघ,संदिप विल्यसन, मा. अतिश पवार (शि. म. संघ), मा. आशितोष येरेल्लु बोपोडी विभाग आणि पत्रकार संतोष सागवेकर आदी च्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर, मतदार संघाने या कागदी नाम फलकांचे अनावरण करण्यात आले.