सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार पुन्हा एकदा थिएटरमध्ये

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार पुन्हा एकदा थिएटरमध्ये


पुणे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. यामुळे मागील आठ महिन्यापासून थिएटर, मल्टिप्लेक्स बंद होते. आता दोनही 50 टक्के आसन क्षमतेसह सुरू झाले आहेत. मागील काही महिन्यात आपण छोट्या पडद्यावर अनेक गोष्टी बघितल्या मात्र त्यात मोठ्या पडद्याची मजा काही औरच असते हे प्रकर्षाने जाणवले. मोठा पडदा खुला झाल्यानंतर असाच एक थरार प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्याने थिएटरमध्ये अनुभवायला मिळणार आहेत, कारण प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित सुपरडुपरहीट ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आह


अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संवेदनशिल भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळविले आहे. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर खतरनाक कामगिरी करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५३ मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. आता पुन्हा एकदा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे, हा चित्रपट पुणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकलूज या शहरात प्रदर्शित झाला आहे.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन