एड्सग्रस्त निराधार मुलांसोबत बालदिन साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टलRespected sir / Madam, Press Release


      *एड्सग्रस्त निराधार मुलांसोबत बालदिन साजरा* 


( बाल दिनानिमित्त विशेष मुलांसाठी अनोखा कार्यक्रम )


बालदिनाचे व दिवाळीचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी ममता फाउंडेशन येथील एच आय व्ही ग्रस्त, निराधार आणि अनाथ मुलांसोबत दिवाळी, बालदिन व त्यांचा वाढदिवस या विशेष मुलांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला. दिवाळीचे फराळ वाटप व केक वाटप करण्यात आले.


यावेळी प्रसंगी दिग्दर्शक रामकुमार शेडगे, ममता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष शिल्पा बुडूक, सामाजिक कार्यकर्ते, विठ्ठलराव वरुडे, प्रशांत पाटील, दीपक आवळे, धनराज गरड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या सुरवातीला रामकुमार शेडगे यांना विद्यार्थ्यांनी औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी शेडगे यांनी ममता संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व यावेळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अ.ब.क चित्रपटातील विविध अनुभव सांगितले. त्याच बरोबर मुलांना चित्रपटसृष्टीत विनोदी किस्से सांगून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. शेडगे पुढे म्हणाले की माझ्या आगामी चित्रपटात ममता संस्थेतील काही विद्यार्थ्यांना चित्रपट काम करण्याची संधी देणार आहे. 


ममता संस्थेचे व्यवस्थापक म्हणाले की चित्रपटसृष्टीत कलाकार व दिग्दर्शक मंडळी यांनी आमच्या संस्थेला भेट देत असतात पण आज बालदिनानिम्मित दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी त्यांचा वाढदिवस आमच्या विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला व त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले त्या बद्दल आम्हाला खूप आनंद झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुडून यांनी केले.


जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस