*अयोध्येतील श्री राममंदिरासाठी मा.बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान अविस्मरणीय : विट स्विकारतांना श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री गोविंदगिरी स्वामींचे ना.नीलम गोर्हेंकडुन वीट स्विकारतांना ऊद्गार!*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



*अयोध्येतील श्री राममंदिरासाठी मा.बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान अविस्मरणीय : विट स्विकारतांना श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री गोविंदगिरी स्वामींचे ना.नीलम गोर्हेंकडुन वीट स्विकारतांना ऊद्गार!* # अयोध्येतील राममंदिराच्या पुनर्बांधणीत अर्पण करण्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीच्या वीट अयोध्या राम मंदिराचे पुणे येथील ट्रस्टी श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द... पुणे/मुंबई दि.१५ : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे.उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्या वतीने देण्याचा इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रगट केली होती. ही चांदीची वीट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दिपावली पर्वकलात व बलिप्रतिपदेच्या पुर्वसंध्येला, गोवर्धनपुजेच्या दिवशी दि.१५ नोव्हेंबर, २०२० दिवशी अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सुपुर्द केली. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, *अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे. तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. अयोध्येच्या श्री राममंदिरासाठी सर्वस्व पणाला लावणारे व सातत्याने भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील.त्यांच्या योगदान स्मृती देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत*. यादरम्यान स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कोरोना लॉकडाऊन काळात दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन ना.डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या येथे आयोजित केलेल्या पूजेचे दर्शन घेतले व वंदन केले. मा.स्वामी गोविंद गिरीमहाराजांचा महावस्त्र अर्पण करुन नीलमताई गोर्हे यांनी सत्कार केला.ना.डॉ.गोऱ्हे यांच्या बहीण जेहलम जोशी यांचा १५/१०/२० रोजीच्या वाढदिवसा निमित्ताने महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. यावेळी पुणे शिवसेना महिला शहर संघटिका सविता मते, पुणे शहर महिला संघटिका तथा नगरसेविका संगीता ठोसर, उपशहरप्रमुख आनंद गोयल आदी उपस्थित होते.