पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची बैठक संपन्न

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची बैठक संपन्न*


*पिंपरी- चिंचवड :-* पुणे पदवीधर मतदार संघाची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारात आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात नगरसेवक व पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रचारयंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.


यावेळी माजी आमदार विलास लांडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पिपरी चिंचवड महानगरपालिका विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ, माजी विरोधीपक्ष नेते नाना काटे, अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या पिंपरी -चिंचवड शहर शहराध्यक्षपदी माधव धनवे-पाटील यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे साडेपाच लाख मतदार असून सर्वाधिक मतदार हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्या पाठोपाठ सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीत 15 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्याही वाढली असून मतदानाचा टक्का ही वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतदानासाठी अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकच उमेदवार असल्याने घटक पक्षातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समाविष्ट करून मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन शरद लाड यावेळी केले आहे.


संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार आहे. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. मागील निवडणुकीत मोदी लाट असतानाही थोड्या मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. मात्र यावेळी मतदानाच्या शेवटच्या मतदारापर्यंत सर्वांनी एकत्रित काम करावे. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image