कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेन्टरमध्ये आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा.. आमदार थोरवे यांनी केले लोकार्पण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेन्टरमध्ये आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा..


आमदार थोरवे यांनी केले लोकार्पण


कर्जत,ता.2 गणेश पवार


                  कर्जत तालुक्याचे शासनाचे डेडिकेटेड कोविड सेन्टरचा दर्जा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कक्षाला देण्यात आला आहे.कोविड साठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड यांची उपलब्धता पूर्ण झाली असून अशा आयसीयूसह व्हेंटिलेटर सेन्टरचे लोकार्पण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान,चार व्हेंटिलेटरसह आयसीयू आणि ऑक्सिजनची मध्यवर्ती सुविधा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली असून ऑक्सिजन लिक्विड ड्युरा सेन्टर देखील कार्यान्वित करण्यात आले.    


कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सुरू केलेले कोविड सेन्टर मधील 50 बेड यांच्या जोडीला व्हेंटिलेटर बेड असावेत आणि आयसीयू सेन्टरची मागणी पूर्ण झाली आहे.सप्टेंबर महिन्यात आलेल्या चार व्हेंटिलेटर सह आयसीयू सेन्टर आणि मध्यवर्ती ऑक्सिजन तसेच लिक्विड ऑक्सिजन ड्युरा सेन्टर यांची पूर्तता झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील पहिल्या शासनाच्या आयसीयू व्हेंटिलेटरसह डेडिकेटेड कोविड सेन्टरचे लोकार्पण आज 2 नोव्हेंबर रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते करण्यात आले.त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर माने,कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजीव धनेगावे,डॉ मनोज बनसोडे आदी प्रमुख उपस्थित होते.त्यावेळी कर्जत तालुक्यातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्यात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,जिल्हा सल्लागार भरत भगत,तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,तालुका संघटक शिवराम बदे,युवासेना तालुका अधिकारी अमर मिसाळ,उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे, विभागप्रमुख शरद ठाणगे,माजी सभापती प्रदीप ठाकरे,नगरसेवक विवेक दांडेकर, वृषाली मोरे,भाजप शहर अध्यक्ष बळवंत घुमरे,कर्जत शिवसेना उपशहर प्रमुख अभिषेक सुर्वे,आदी उपस्थित होते.कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील सर्व डॉक्टर, आरोग्यसेविका,आरोग्यसेवक,सफाई कर्मचारी अशा 45 जणांचा कोरोना योद्धा प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.


                  यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आता आवशयक असलेले डॉक्टर आले आहेत,त्यामुळे आपापसात असलेले मतभेद दूर करून चांगली सेवा देण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी समजून योगदान देण्याचे आवाहन केले.आम्ही लोकप्रतिनिधी ज्यावेळी 18 तास काम करतो,त्यावेळी आपल्या लहानशा चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो.त्यामुळे सर्व सुविधांनी युक्त असलेल्या रुग्णालयात आता सर्व उपचार झाले पाहिजेत आणि कोणत्याही रुग्णाला बाहेर हलवावे लागणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन आमदार थोरवे यांनी केले.तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जत तालुक्यातील सर्व भागातून रुग्ण येत असताना आरोग्य विभागाच्या चुकीमुळे कोणताही रुग्ण दगवणार नाही याची देखील काळजी घेण्याची आवाहन आमदार थोरवे यांनी केले.डॉक्टर आणि स्टाफ यांची रिक्त पदे भरली गेली असून आता सर्वांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन करतानाच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तात्काळ सुरू करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माने यांनी केली,तर तालुक्यातील कुपोषण शून्यावर आणण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालय मध्ये बाळ उपचार केंद्र सुरू करण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने तात्काळ करावी अशी सूचना देखील केली.