पुणे प्रवाह न्युज पोर्टल
#प्रेसनोट प्रसिद्धीसाठी...
*नीता ढमालेंचा पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचा निर्धार*
पुणे : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बुधवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या.
नीताताई ढमाले म्हणाल्या, "पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांचा कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, अशी नुसतीच चर्चा राजकीय पक्ष करीत असतात. प्रत्यक्षात उमेदवारी देताना याचा त्यांना विसर पडतो. गेल्या एक वर्षांपासून पदवीधर निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. निस्वार्थीपणे पक्षात काम केले. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली. पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी मी एक सक्षम महिला पर्याय म्हणून निवडणुकीत विजयाचा निर्धार करून उतरले आहे."
पुढे त्या म्हणाल्या की, "राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी योजना प्रभावी पद्धतीने राबविल्या, तर यावर उपाय ठरू शकतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेली आहे. आरक्षणाच्या कचाट्यात परिक्षा अडकलेल्या आहेत. महापोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी होण्याची गरज आहे. तीन वर्षांपासून पोलीस भरती करू, असे पोकळ आश्वासन दिले जात आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हातात काय मिळते, हा मोठा प्रश्न आहे. शासकीय निकऱ्यामध्ये कंत्राटीकरण सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."
पुणे विभागात सर्वच जिल्ह्यात गेल्या एक वर्षाचपासुन प्रभावी काम सुरू आहे. प्रचाराचे योग्य नियोजन सुरू असून, मतदारांपर्यत पोहचणार आहे. पदवीधरांचा विश्वास संपादन केलाच आहे. त्यांच्याशी नियमित संवाद सुरू असून, त्यांच्या अडीचणी समजून घेत आहे. यावेळी त्यांनी निवडणूकीतील प्रचाराचे नियोजनाबाबत माहिती दिली.