(WHO)"वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटने कडून सुप्रसिद्ध कवियत्री मा. अर्चना दिलीप सुतार यांना आंतरराष्ट्रीय "कोरोना योद्धा" पुरस्कार प्रदान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



"(WHO)"वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटने कडून सुप्रसिद्ध कवियत्री मा. अर्चना दिलीप सुतार यांना आंतरराष्ट्रीय "कोरोना योद्धा" पुरस्कार प्रदान


 जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना योद्धा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या कवियत्री अर्चना सुतार.


 सातारा:(पाचवड) ता.वाई सुप्रसिद्ध कवियत्री मा. अर्चना दिलीप सुतार एक शिक्षक आणि चांगल्या समाजसुधारक म्हणून गाजल्या जात असतानाच त्यांना(WHO) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने जीचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. आंतरराष्ट्रीय कोरोना योद्धा म्हणून त्यांना गौरवले आहे. त्यांचे कोरोना काळातील कवितांतून कोरोना पासून लोकांनी बचावासाठीचे कार्य जिल्ह्यापुरते,महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते भारतभर पसरून भारताबाहेर परदेशात पोहचले. याचे श्रेय म्हणून(121) कोरोना योद्धा सन्मानांनी त्यांना अनेकांनी पुरस्कृत केले. हे पुरस्कृत झाले असतानाच सर्वात मोठी जागतिक पातळीवर सर्व देशांची मिळून चालत असलेली सरकारी संघटना म्हणजेच "वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन" जागतिक आरोग्य संघटनेनेही मलेशिया देशाने पुरस्कृत केल्यानंतर पुन्हा त्याच देशाने (covid-19) कोविंड योद्धा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना त्यांच्या जागतिक कार्याची दखल घेऊन प्रदान केला आहे. हे करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने या कार्याचे फार कौतुक केले आहे.


                    सुप्रसिद्ध कवियत्री अर्चना सुतार जागतिक आंतरराष्ट्रीय कोरोना योद्धा ठरल्याचे कळल्यावर सर्व स्तरातील लोकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.