पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- निवडणूक आयोगाकडून पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला,या अनुषंगाने पुणे शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेचे नियमावलीची काटेकोर पालन होण्यासाठी पुण्यनगरीचे प्रथम नागरिक मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेचे वाहन तातडीने जमा करुन मोटर सायकलने पुढील प्रवासाला सुरुवात केली.