सौ चुहे खाके बिल्ली चली हज को चंद्रकांत पाटलांमुळेच पुणे मतदारसंघातील पदवीधरांचे नुकसान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची टीका

पुणे प्रवाह न्युज पोर्टल कृपया प्रसिद्धीसाठी


सौ चुहे खाके बिल्ली चली हज को


चंद्रकांत पाटलांमुळेच पुणे


मतदारसंघातील पदवीधरांचे नुकसान


राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची टीका


पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) - पुणे पदवीधर मतदारसंघाचे तब्बल 11 वर्षे प्रतिनिधित्व करणार्‍या चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघातील पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविला नाही. राज्यात सरकार असतानाही पदवीधरांकडे दूर्लक्ष करणार्‍या पाटलांना आता निवडणुकीमध्ये पदवीधरांची आठवण झाली आहे. खोट बोलण्यात माहिर असलेल्या चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडी सरकारवरील टीका म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार केला. या दरम्यान पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. राज्य सरकारचा उल्लेख करंटा असा करतानाच महाविकास आघाडीमुळे पदवीधरांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. पाटील यांच्या टीकेला संजोग वाघेरे यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेताना वाघेरे म्हणाले, सहा वर्षांच्या दोन टर्ममध्ये चंद्रकांत पाटील यांना पदवीधरांनी संधी दिली. मात्र त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविला नाही. अकरा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काय केले हे त्यांनी अगोदर जाहीर करावे.


केवळ खोट बोलण्यात आणि टीका करण्यात माहिर असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात भाजपाचे सरकार असताना याच पदवीधरांच्या आशिर्वादामुळे पाच वर्षे मंत्री होते. मात्र आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काहीही न करणार्‍या पाटलांना आता पदवीधरांचे प्रश्न आठवू लागले आहेत. आपले अपयश लपविण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करत असून त्यांच्या टिकेला आता कोणीही गांभिर्याने घेत नाही. 1 डिसेंबर रोजी पदवीधर आपला रोष मतपेटीतून व्यक्त करतील आणि चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जागा दाखवून देतील, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.


महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरात जनतेसाठी घेतलेल्या निर्णयामुळे पदवीधर महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याने अरुण लाड यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वासही वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image