**
*मुंबई :* कोरोना कालावधीमधील वाढीव वीज बिले कमी करण्याबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होईल अशी शक्यता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला. तसेच घरामध्ये राहावे लागल्यामुळे अधिक वीज बिले आली. त्यामुळे या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी वीज सवलती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सूत गिरण्या, कापड गिरण्या यांनाही सवलतीच्या दराने वीज पुरवठा करणे, तसेच प्रलंबित वीज जोडण्यांचे अर्ज गतीने कशा प्रकारे निकाली काढता येतील त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कृषी पंप वीज जोडणी धोरणाबाबत निर्णय होणार असल्याचेही ऊर्जामंत्री संकेत दिले आहे. यामुळे सर्व सामान्य गोर गरिब नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांना दिलासा मिळेल.
*****************'*****
*यांचा पाठपुरावा भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन करण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत
भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष करीत आहे.
निर्णयाने सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ....
महाविकास आघाडी सरकारचे
जाहीर आभार*
💐🌺🙏🙏🙏🙏🙏🙏