पुणे प्रवाह न्युज पोर्टल
श्रीलंका या देशाकडून नामांकित कवियत्री मा.अर्चना दिलीप सुतार पाचवड (सातारा) यांना NWLO-TBC या जागतिक संस्थेमार्फत इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन अवॉर्ड-2020 पुरस्कार प्रदान
सातारा: रा. पाचवड ता. वाई येथील प्रसिद्ध कवियत्री मा.अर्चना दिलीप सुतार समाजातील कोणतीही माणसे म्हणजे जाती-धर्म नसतोच मानवता हा एकच धर्म असतो मग त्यात माणुसकी असली म्हणजे सगळ्याच गोष्टी अशक्य सुद्धा शक्य होऊन जातात.इतरांबद्दल माया, दया, प्रेम अंगी असणे जरुरीचे असते.सत्याच्या वाटेवर चालत असताना अनेक अडचणी खाचखळगे असतात परंतु कोणत्याही गोष्टीला न डगमगता आपण आपले काम निर्मळ आणि निस्वार्थी मनाने केले की फुलांची बरसात झाल्यासारखे जीवन सफल झाल्यासारखे वाटते. ईश्वरावर श्रद्धा अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर यश संपादन झाल्यावाचून राहत नाही. अशाच विचारांची सोबत असणाऱ्या जगातील माणसे एक परिवार समजून आजवर कवियत्री अर्चना दिलीप सुतार यांनी समाजहित योगी कविता करून करोना संकटा अगोदरही आणि कोरोनाच्या काळातही सामाजिक कवितांतून संदेश देण्याचे काम केले आहे. जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले असताना करोना विषयावर सखोल अभ्यास करून त्या पासून वाचण्यासाठी तसेच त्याचे वास्तव वर्णन करून अनेक कविता समाज माध्यमाद्वारे समाजापुढे मांडल्या आहेत.याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने आणि भारतातील प्रत्येक राज्याने त्यांना अनेक सन्मानांनी गौरविले आहे. हे गौरवित असताना एक त्याच्या पुढची पायरी म्हणूनच देशातच नव्हे तर बाहेरील श्रीलंका देशाने त्यांना NWLO-TBC या जागतिक संस्थेमार्फत इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन अवॉर्ड-2020 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करत अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळताच अनेक जणांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.