दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



*दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा- विभागीय आयुक्त सौरभ राव*


पुणे- भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दिनांक 1 डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. यामध्ये भारत निवडणूक आयोगाने एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये


(No voters to be left Behind) व सहजतेने मतदान


(Accessible Election) याबाबी लक्षात घेऊन मतदान प्रक्रियेत दिव्यांगाचा सहभाग वाढावा म्हणून खालील बाबी निश्चित केल्या आहेत.


 सर्व ग्रामस्तर व तालुकास्तरावर दिव्यांग मतदारांना सहाय्य करण्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे.


 मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा (रॅम्प, व्हीलचेअर) पुरविल्या आहेत


दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येइल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मदतीसाठी मतदान केंद्रांवर सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे.


 वरील मदतीसाठी दिव्यांग मतदार PWD APP द्वारे 


(https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp)


 आपली नोंदणी करून आपली आवश्यकता नमूद करू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.


 सर्व दिव्यांग मतदारांनी मतदानासाठी दिलेल्या वेळेदरम्यान उपस्थित राहून निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही सौरभ राव यांनी केले आहे.