सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान 'लोककला २०२०'  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान 'लोककला २०२०'  


विद्यापीठाच्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे आयोजन 


 


 


पुणे, दिनांक २४ नोव्हेंबर २०२० : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतीय लोककला अभ्यास संशोधन आणि कल्याण केंद्रामार्फत भारतातील लोककलांच्या जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी अनेक वेगवेगळ्या उपक्रम राबविले जातात. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेले सात-आठ महिने लोककलावंतांना त्यांचे कार्यक्रम सादर करता आलेले नाहीत. वंशपरंपरेने आपापल्या लोककलांचे जतन करणाऱ्या लोककलावंतांवर यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे 'लोककला २०२०' हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे.


 या उपक्रमांतर्गत सलग २० दिवस दररोज २० मिनिटे या प्रमाणे २० वेगवेगळे लोककलांचे प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजमाध्यमांवरून सादर केले जाणार आहेत. या निमित्ताने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर लोककलावंतांना प्रक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. दि. ३० नोव्हे. २०२० ते १९ डिसेंबर २०२० या कालावधीत दररोज रात्री ८.०० वा. हे सादरीकरण प्रसारीत केले जाईल. यात पोवाडा, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, भराडी, हलगीवादन, वारू, लखाबाईची गाणी, लावणी इ. कार्यक्रम सादर होणार आहेत. सदर कार्यक्रमांचा सर्व रसिकांना समाजमाध्यमांवरून विनामुल्य लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन दि. ३० नोव्हें. २०२० रोजी संध्या. ६.०० वा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. पुणे जिल्हयातील या लोककलावंतांना दाद देण्यासाठी सर्व रसिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे मानद संचालक प्रा. डॉ. प्रवीण भोळे यांनी केले आहे.


 


 


३०/११/२०२० पोवाडा : राजाराम कदम आणि मंडळी, चाकण


१/१२/२०२० वासुदेव : शाहीर साळुंखे आणि मंडळी, भुगांव


२/१२/२०२० शहनाई : संजय गायकवाड आणि मंडळी, औसरी बुद्रुक


३/१२/२०२० जात्यावरची गाणी : चमूबाई वैरागी आणि मंडळी, राक्षेवाडी


४/१२/२०२० जागरण : प्रमोद अटक आणि मंडळी, बेल्हे


५/१२/२०२० हालगी वादन : अंकुश पाटोळे आणि मंडळी, दोंदे


६/१२/२०२० गवळण : नरेश पंचरास आणि मंडळी, धामणी


७/१२/२०२० वारू : भरत कुचेकर आणि मंडळी, पठारवाडी


८/१२/२०२० तमाशाची गाणी : नंदराणी भोकटे आणि मंडळी, चैतन्यपूर


९/१२/२०२० पोवाडा : प्रभाकर पंचरास आणि मंडळी, धामणी


१०/१२/२०२० आराधीची गाणी : राधाबाई गालफाडे आणि मंडळी, चाकण


११/१२/२०२० भराडी : राजेंद्र जाधव आणि मंडळी, नारायणगाव


१२/१२/२०२० गण : संदीप पंचरास आणि मंडळी, लोणी


१३/१२/२०२० वाजंत्री : काळुराम गायकवाड आणि मंडळी, कडूस


१४/१२/२०२० लखाबाईंचं गाणं : बबन पंचरास आणि मंडळी, धामणी


१५/१२/२०२० गोंधळ : विलास अटक आणि मंडळी, बेल्हे


१६/१२/२०२० बतावणी : ज्ञानेश्वर पंचरास आणि मंडळी, लोणी


१७/१२/२०२० पोतराज : सुखदेव साठे आणि मंडळी, धायरी


१८/१२/२०२० शाहीर आणि पोवाडा : मंगेश तपासे आणि मंडळी, गोंधळवाडी


१९/१२/२०२० लावणी : रेश्मा परितेकर आणि मंडळी, पुणे


8 PM Live on 


 YouTub lokkala 2020 : https://www.youtube.com/channel/UCkoDdvjkDvPDYSop7xeZMqQ


 Lalit Kala Kendra Instagram Live : https://www.instagram.com/lalitkalakendra/?hl=en


 Lalit kala Facebook Live : https://www.facebook.com/