284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच मुलांसारखे प्रेम करणारी माय... म्हणून च झाडे_लावा_झाडे_जगवा... 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल कर्नाटक :- दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय.


थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.


प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता.


#झाडे_लावा_झाडे_जगवा.