क्रौर्याचा कळस !  ११ वर्षांच्या मुलीची हत्या,  डोकं विटेने ठेचलं....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


क्रौर्याचा कळस !


 ११ वर्षांच्या मुलीची हत्या, 


डोकं विटेने ठेचलं....


भदोही :- ११ वर्षांच्या एका दलित मुलीची उत्तर प्रदेशात हत्या करण्यात आली. त्या मुलीचं डोकं विटेने ठेचण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातल्या भदोही जिल्ह्यातल्या एका गावात ही घटना घडली. ही मुलगी दुपारच्या वेळेस थोडासा आराम करावा म्हणून शेतात गेली होती. त्यावेळी तिची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ठरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दलित समाजातील दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन कुटुंबात असलेल्या कलहामुळे या मुलीची हत्या करण्या आली असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या धक्कादायक घटनेत हत्या झालेल्या मुलीवर बलात्कार झाला होता की नाही हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मात्र मृत मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्कार झाल्याचा कोणताही आरोप अद्याप केलेला नाही. ग्यानपूरचे पोलीस अधिकारी भूषण वर्मा म्हणाले की, “या मुलीचा मृतदेह आम्हाला शेतात आढळून आला. साधारण दुपारी ३ च्या सुमारास आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली. दुपारी १२.३० च्या सुमारास ही मुलगी शेतात गेली होती. मात्र तिथून ती परतली नाही. ज्यानंतर तिच्या कुटुंबायांनी तिची शोधाशोध सुरु केली. मात्र या मुलीच्या कुटुंबीयांना तिचे प्रेतच शेतात दिसले. ज्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं आणि आम्ही घटनास्थळी दाखल झालो. या मुलीचं डोकं विटेने ठेचण्यात आलं आहे.” असंही भूषण वर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. या प्रकरणात बळी पडलेली मुलगी आणि तिला ठार करणारे आरोपी हे दलित समाजाचे आहेत. अद्याप या मुलीवर मृत्यूच्या आधी बलात्कार झाला आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. तसंच तिच्या कुटुंबीयांनीही कोणताही आरोप केलेला नाही.