ज्ञानेश्वरांचे विश्वात्मक तत्वे जगाला शांतीचा मार्ग दाखवतील  स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे विचार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे, 2 ऑक्टोबर: “ संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांनी ज्ञान आणि वैराग्य काय आहे हे सांगितले. त्याच ज्ञानाच्या आधारेच मानवला आत्मज्ञानाची अनुभूती येते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेले विश्वात्मक तत्वेच हे जगाला शांतीचा मार्ग दाखवेल. व्यक्ति, समष्ठी, सृष्टी आणि प्रकृती या गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या आहेत. मानवी जीवन सार्थ करण्यासाठी आत्मचिंतनाबरोबरच भक्ती व तपश्चर्या गरजेची आहे.” असे विचार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन गोविंददेव गिरीजी महाराज, सुप्रसिद्ध विद्वान व साधक स्वामी योगी अमरनाथ व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. विरेंद्र हेगड हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, डॉ. आर.एम. चिटणीस, प्रा. पुष्पिता अवस्थी, मिटसॉग व पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा हे उपस्थित होते.


स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले,“ डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शिक्षण, मानवी हक्क, शांतता अभ्यास, विज्ञान आणि अध्यात्म इत्यादी विविध विषयांवर बरेच पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये जगभर पसरलेली नैतिकता सापडेल. जागतिक शांततेचा संदेश देणारी सार्वभौम शांतता आणि सौहार्दाच्या शोधात मानवाधिकार, मानवी मूल्ये आणि सामाजिक बदल दिसेल. डॉ. कराड यांची सर्वात प्रेरणादायक बाब म्हणजे त्यांनी जागतिक शांतता आणि त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य यावर पुस्तके लिहिणे सुरूच ठेवले आहे. त्यांचे जीवन जसे आहे तसेच पुस्तके ही प्रेरणादायी आहेत.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ डॉ. कराड यांनी उत्तम पुस्तक लिहिले आहे. भगवद गीता, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांनी मानव कल्याणाचा उपदेश केला आहे. त्याच तत्वाचा मानव कल्याणसाठी कसा उपयोग करता येईल हे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. हे पुस्तक कल्पनाकरू शकत नाही अशा प्रकारचे आहे. यातून संपूर्ण मानवजातीला विश्वात्मक संदेश दिला जाईल. निसर्गाचे चक्र सतत विस्तार पावत आहे. हे सर्व कोण घडवित आहे. हे एक गुह्य आहे.”


स्वामी योगी अमरनाथ म्हणाले,“ साधना, तपस्चर्या आणि भक्ती या गोष्टी मानवला परमांनद देतात. या सृष्टीवर साधनेशिवाय काहीच साध्य होऊ शकत नाही. तसेच समर्पण भाव व निष्काम कर्म करीत राहिल्यास मानवाचे उत्थान होते.”  


प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ संत ज्ञानेश्वरांनी 730 वर्षापूर्वी ज्ञानतत्व, विश्वात्मक तत्व सांगितले जे सर्व धर्मासाठी लागू होतात. हे गुपित तत्व आज प्रत्येक मानवासाठी महत्वपूर्ण आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात हे तत्वे मानवाला सुख, समाधान आणि शांती देईल.”


राहुल कराड यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली.


प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस यांनी आभार मानले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image