पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था या संस्थेची सिटी प्राईड स्कूल या नावाने निगडी येथे शाळा आहेत. निगडी येथील शाळा सन २००३ पासून आजपर्यंत सुरु आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था या संस्थेची सिटी प्राईड स्कूल या नावाने निगडी येथे शाळा आहेत. निगडी येथील शाळा सन २००३ पासून आजपर्यंत सुरु आहे.   


       RTE Act 2009 कलम १२(१)(c) नुसार अल्पसंख्यांक वगळता इतर प्राथमिक शाळांना इयत्ता पहिली किंवा त्या पूर्वीच्या प्रवेश स्तर वर्गात, सुरुवातीच्या प्रवेश स्तरावर इयत्ता पहिलीच्या प्रवेशाच्या क्षमतेच्या २५% प्रवेश देणे बंधनकारक आहे, म्हणजेच असा २५% प्रवेश कोटा संस्थेला शासनाला समर्पित करावा लागतो. या २५% विद्यार्थ्यांचा कोटा शासनाला समर्पित होऊ नये आणि संस्थेला आर्थिक लाभ व्हावा म्हणून औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेने त्यांची संस्था नोंदणीच्या वेळी अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त नसताना (५०% पेक्षा जास्त मूळ विश्वस्त कोंकणी भाषिक नसताना) नोंदणी केली होती. म्हणजेच, सदर संस्था हि अल्पसंख्यांक भाषिक (कोंकणी) नव्हती. २०१६ पर्यंत सदर शाळा हि अल्पसंख्यांक भाषिक (कोंकणी) नव्हती व त्यांनी त्या शाळेमध्ये RTE २५% प्रवेश दिलेले आहेत.


२५% प्रवेशातून सुटका होण्यासाठी संस्थेने २०१६ मध्ये अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे अल्पसंख्यांक दर्जा मान्यतेचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला. सदर अर्ज करताना संस्थेचे एकूण मूळ ७ विश्वस्त होते व त्यापैकी ७ मूळ विश्वस्त कोंकणी भाषिक असल्याचे दाखविले आहे. तसेच सद्याचे ७ विश्वस्त म्हणजे दिनांक १८/१०/२०१६ रोजी सादर केलेल्या अर्जामधील दाखवेलेले ७ विश्वस्त सद्याचे नाहीत.


दिनांक १८/०१/२०१७ रोजी सह धर्मादाय आयुक्त पुणे यांचे कार्यालयात संस्थेने बदल अर्ज क्रमांक ३९७/२०१७ दाखल केला होता, त्याप्रमाणे दिनांक १८/१०/२०१६ रोजी (१) श्री अविनाश विनायक सवाई (२) डॉ शशिकांत बाजीराव जोशी (३) सौ जयाताई मोडक व (४) श्रीमती श्रद्धा ओझा यांची नोंद विश्वस्त म्हणून कमी करण्यासाठी बदल अर्ज दाखल केला. म्हणजे दिनांक १८/१०/२०१६ रोजी वरील चार विश्वस्त त्यादिवशी म्हणजेच अर्ज करताना सध्याचे विश्वस्त होते. दिनांक १८/१०/२०१६ रोजीच्या अर्जावर अल्पसंख्यांक विकास विभाग कार्यालयात दिनांक ०४/११/२०१६ सुनावणी झाली व त्यावेळेस त्यांना लक्षात आले कि, संस्थेच्या मूळ घटनेमध्ये कोंकणी भाषेसाठी कोणताही उद्देश नाही व तसेच मूळ सात विश्वस्तांचे शाळा दाखले किंवा शाळा निर्गमन उतारा मध्ये कोंकणी ह्या मातृभाषेचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांनी नवीन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तथापि, १८/१०/२०१६ रोजीच्या विश्वस्तांमध्ये कोंकणी भाषिक नसल्याने संस्थेने चार विश्वस्त बाहेर काढले व नव्याने नवीन चार विश्वस्त संस्थेमध्ये घेतले. तसेच संस्थेच्या मूळ घटनेमध्ये कोंकणी भाषिकसाठी कोणताही उद्देश नसल्याने संस्थेने दिनांक २७/१०/२०१६ रोजी घटनेमध्ये बदल करण्यासाठी मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्या दरम्यान अल्पसंख्यांक विकास विभाग कार्यालयात सादर केलेला दिनांक १८/१०/२०१६ रोजीचा अर्ज प्रलंबित होता.


संस्थेने नवीन कोंकणी भाषिक लोकांना विश्वस्त करून घेऊन अल्पसंख्यांक दर्जा मान्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पहिला अर्ज प्रलंबित असताना व तो स्वीकारला किंवा नाकारला नसताना दुसरा अर्ज अल्पसंख्यांक विभागामध्ये दिनांक १९/०१/२०१७ रोजी अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र मिळावा म्हणून विनंती केली.


मी असे नमूद करतो कि, औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेची सुनावणी १९/०१/२०१७ रोजी घेण्यात आली होती व दिनांक १५/०२/२०१७ रोजी कोंकणी भाषा हि मराठी भाषेची पोटभाषा आहे असे कारण देत अर्ज फेटाळण्यात आला. अशाप्रकारे दिनांक १९/०१/२०१७ चा दुसरा अर्ज फेटाळण्यात आला. दुसरा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे संस्थेने दिनांक ०६/०३/२०१७ रोजी पुनर्विचार अर्ज नियमात तरतूद नसताना ज्यांनी सुनावणी घेतली होती त्याच अधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर केला.


वरील सर्व वस्तुस्थिती पाहता सुरवातीस प्रथम सादर केलेल्या अर्जान्वये सदर संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र देता येत नाही किंवा संस्था ते मिळविण्यासाठी अपात्र आहे हे स्पष्ट होते. असे असताना पहिला अर्ज जो अल्पसंख्यांक दर्जा मान्यता मिळण्यासाठी संस्थेला अपात्र ठरविणारा आहे त्यानुसार अल्पसंख्यांक दर्जा मान्यता प्रमाणपत्र देण्यात आले. 


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image