जावाऱ्यांच्या भांडणात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून आमदारकी साठी आघाडीवर* *त्याचप्रमाणे शिव चरित्रकार श्रीमंत कोकाटे यांनी या मतदारसंघातून आमदार की लढण्‍यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 **सोलापूर:- प्रतिनिधी* पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघ


निवडणूक केंव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विधान परिषद आमदार म्हणून जाण्यासाठी इच्छुकांनी गॉडफादर मार्फत उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. पुण्यातील उद्योगपती माजी खासदार संजय काकडे यांचे जावई तथा माजी मंत्री आ. सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख आणि कृषी महामंडळाचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते-पाटील यांचे जावई तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात आमदारकीसाठी आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही दिग्गजांनी आमदारकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.


जुलै महिन्यात पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक होणे अपेक्षित होते. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. आता बिहारची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक केंव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत जाण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे.


भाजपाकडून प्रारंभी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे नाव अंतिम मानले जात होते. पण, आ. सुभाष देशमुख यांचे चिरंजीव आणि लोकमंगल फौंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या नावाची पुणे पदवीधरसाठी चर्चा सुरु झाल्यापासून चरेगावकर यांचे नाव मागे पडले आहे. लोकमंगलच्या चमूने पदवीधर झालेल्या युवकांची मतदार यादीत नाव नोंदणी करुन घेण्यासाठी जोरदार मोहीम राबविली. शिवाय माजी खासदार संजय काकडे यांनीही जावई रोहन यांना आमदार करण्यासाठी पुणे शहर जिल्ह्यात फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपाकडून आ. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड मतदारसंघ सोडलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, खासदार गिरीष बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, राजेश पांडे, माणिक पाटील चुयेकर, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस यांच्याही नावाची चर्चा आहे.


साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना गतवेळी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून केवळ दीड हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. सातारा लोकसभा मतदारसंघात पिताश्री विजयी झाल्यानंतर सारंग पाटील यांनी पक्ष संघटनेसाठी अधिक वेळ दिला आहे. त्यामुळे पुणे पदवीधरची निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. *त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते यांचे नाव समोर आले आहे. खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती म्हणून उमेश पाटील यांची ख्याती आहे*. त्याचबरोबर *राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत*. शिवाय युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभरात राष्ट्रवादी पक्ष मजबुतीसाठी मोठे काम केले आहे. *त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेश पाटील यांचे नाव अंतिम मानले जात आहे*. गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांच्या विरोधात अरुण लाड यांनी बंडखोरी केली. त्यामुळे सारंग पाटील यांचा पराभव झाला होता. यावेळी अरुण लाड, माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, निता ढमाले, प्रताप माने यांचीही नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.


-------------------------------------


*श्रीमंत कोकाटे यांच्या भेटीगाठी शिव चरित्रकार श्रीमंत कोकाटे यांनी पुणे पदवीधर*


*मतदारसंघातून आमदारकी* 


*लढविण्यासाठी जोरदार तयारी*


*सुरु केली आहे*, *या मतदारसंघातून तयारीला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी त्यांना दिल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानुसार कोकाटे यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील नेतेमंडळी, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे तिकिट मिळविण्यासाठी उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे, बाळराजे पाटील आणि अरुण लाड यांच्यात जोरदार रस्सीखेच होईल. किंवा ऐनवेळी वेगळेच नाव पुढे येण्याची शक्यता आहे* .


----------------------------------------