रुग्‍णांसाठी पोस्ट कोविड स्वतंत्र फॉलोअप बाह्यरुग्ण विभाग सुरू एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे, दि. 19 ऑक्टोबरः कोविड 19 या संसर्गजन्य आराजातून बरे झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात ‘स्वतंत्र कोविड फालोअप बाह्यरुग्ण विभाग’ आजपासून सुरू करण्यात आला आहे, जाो एक अभिनव उपक्रम आहे. अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांनी सांगितले.


या रुग्णालयाच्‍या माध्यमातून आतापर्यंत मध्यम व तीव्र लक्षणे असणार्‍या अकराशेहून अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करून बरे झाले आहेत. अशा रुग्णांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यसाठी हे बाह्यरूग्ण विभाग कार्यरत आहे. येथे रुग्‍णांच्‍या सेवेसाठी फिजिशियन, पल्मोनॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मनोविकार तज्ञ, आहारतज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. तसेच एकत्रित सल्ला, मार्गदर्शन व उपचार सेवा कमी दरात उपलब्ध करून दिले आहे. कोविड 19 या संसर्गजन्य आजारातून बरे झालेल्या रुग्णांना अशक्तपणा, थकवा, दम लागणे, निद्रानाश, मानसिक तणाव इत्यादी लक्षणे जाणवतात. तसेच, रक्तदाब, डायबिटीससारख्या सह रूग्णता (कोमॉर्बीडिटीज) असणार्‍या रूग्णांनी कोविड आजारानंतर स्वतःची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.


या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. सुचित्रा नागरे म्हणाल्या, हे बाह्यरूग्ण विभाग सोमवार ते शनिवार सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत सुरू असेल. आता कोविड रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून, नॉन कोविड रुग्णांसाठी सर्व विभागात पूर्ववत सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच, पात्र लाभार्थी रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उपलब्ध आहे.


रुग्णालय अधीक्षक डॉ. पी.एस.कामत म्हणाले, कोविड रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. कोविड फॉलोअप बाह्यरुग्ण विभागात येताना रुग्णांनी आधीच्या उपचारांची फाईल सोबत आणावी