पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी आनंद लक्ष्मण सवाणे यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी दिले .
आनंद लक्ष्मण सवाणे हे ताडीवाला रोड भागात राहत असून गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत .त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले . त्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली . पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मजबुत बांधणी करणार असल्याचे आनंद लक्ष्मण सवाणे यांनी नियुक्तीनंतर सांगितले .