शेतकरी बचाव व्हर्चुअल रॅली मध्ये कर्जत काँग्रेस सहभागी

पुणे प्रवाह न्युज पोर्टलकर्जत,ता.15 गणेश पवार


              महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले त्याच्या विरोधात राज्यात सहा ठिकाणी शेतकरी बचाव रॅलीचे व्हर्चुअल पद्धतीने नियोजन केले होते. या रॅलीचे थेट प्रक्षेपणही केले होते. त्यामध्ये कर्जत काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


                  महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने कोरोना संकटात सुरक्षितता म्हणून राज्यातील पालघर,संगमनेर, औरंगाबाद,कोल्हापूर,उमरेड, अमरावती या ठिकाणच्या सभा  आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये सर्व राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी व्हावेत म्हणून व्हर्चुअल पद्धतीने थेट प्रक्षेपण आयोजित केले होते. कर्जत तालुका काँग्रेसने यांनी आमराई मध्ये थेट प्रक्षेपण पहाता यावे म्हणून व्यवस्था केली होती.


                तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी या व्हर्चुअल रॅलीचा उद्देश सांगून आपल्याला आता स्वाक्षरी मोहीम सुद्धा घ्यायची आहे असे स्पष्ट केले. कुतूबुद्दीन मुल्ला यांनी, काँग्रेसची साथ दिली तर शेतकऱ्यांचे नक्की भले होईल. असे सांगितले. त्यानंतर थेट प्रक्षेपणाद्वारे सुरू असलेले रॅली मधील काँगेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ  उपस्थितांनी घेतला.नेरळ शहर युवक अध्यक्ष यतीन यादव यांनी आभार मानले.


               याप्रसंगी माजी नगराध्यक्ष धंनजय चाचड,माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे,माजी सरपंच भीमराव जाधव, कर्जत विधानसभा युवक काँगेस अध्यक्ष सागर परदेशी,नेरळचे संदीप सोनटक्के,फईम आढळ,मेराज खान, मिलिंद सुर्वे आदी उपस्थित होते.


फोटो ओळ


शेतकरी बचाव रॅलीचे थेट प्रक्षेपण पाहताना कर्जतकर