बाकरवडी की भाकरवडी ?;  चितळे बंधू म्हणतात…

पुणे प्रवाह न्युज पोर्टलपुण्यातल्या चितळे बंधूंचे दुपारचे बंद दुकान हा पुण्याबद्दल बोलताना कायमच चेष्टेचा विषय असल्याचे पहायला मिळतं. मात्र २०१७ च्या सुरुवातीलच  ‘चितळे बंधू’ यांनी दुपारी एक ते चार दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आजही अनेकदा चितळे बंधूंना यावरुन ट्रोल केलं जातं. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चितळे बंधू चर्तेत असण्याचं कारण वेगळचं आहे.


 चितळे बंधूंच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. वाक्य अगदी सोप्प आहे. 


चितळे बंधूंनी ट्विटरवर केवळ ‘ते बाकरवडी आहे भाकरवडी नाही!’ 


एवढचं पोस्ट केलं आहे. य़ावरुन आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु असून जिभेचे चोचले पुरवणाऱ्या बाकरवडीच्या नावावरुन तुफान चर्चासत्रच या ट्विटखाली भरल्याचे चित्र दिसत आहे. 


 चितळेंच्या या ट्विटवर पहिला रिप्लाय आहे 


पुणेकर असणाऱ्या आनंद परांजपे यांचा. ‘या संदर्भात खुलासा केल्याबद्दल धन्यवाद’, असं परांजपे यांनी म्हटलं आहे. 


 “माझ्याकडे ‘चितळे बंधूं’वर जोक आहे पण…”; ट्रोल करणाऱ्याला चितळेंकडून ‘पुणेरी टोमणा’, म्हणाले… त्यानंतर काहींनी गुजरातमध्ये या पदार्थाला भाकरवडीच म्हणतात असं सांगितलं आहे. या ट्विटवर अनेक गुजराती लोकांनी रिप्लाय करुन आमच्याकडे याला भाकरवडीच म्हणतात असं स्पष्ट केलं आहे.