पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रबंधक पदी हिंदरत्न श्री.दिपक लोंढे यांची नियुक्ती
सांगली :- 'हिंदरत्न' जीवरक्षक मानव.सांगली.(महाराष्ट्र राज्य) ह्या
सामाजिक बांधिलकी जपुन सतत समाजसेवा करणाऱ्या आपल्या संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष 'हिंदरत्न' राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री.दिपक लोंढे यांच्या स्वनिधीतून कोरोना महामारी च्या लॉकडाऊन संकट काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या...देव रूपातील डॉक्टर्स,नर्सेस,पोलीस प्रशासन,पोलीस मित्र,स्वछता दूत, कामगार व पोटाच्या भुकेसाठी वणवण भटकणारे कांही अत्यंत गरीब भटके मनोरुग्ण लोक अश्या अडीचशे ते तीनशे लोकांना दररोज सकाळी मोफत चहा-नाष्टा,एक्वा पाणी पुरविले.आम्ही नेहमीच प्रसिध्दी माध्यमापासून दूर राहून,गेली पाच वर्षे नैसर्गिकरित्या संकटांत सापडलेल्या पूरग्रस्त,भूकंपग्रस्त व वादळग्रस्त यांना मदतीचा हात दिला आहे.अजूनही देत आहोत.नागरिक मायबाप यांच्या आशीर्वादाने आज अखेर आम्हीं अशी अनेक समाजसेवा कार्ये करत आलो आहोत.पण आज जाणीव झाली. आमच्या ह्या निस्वार्थ कार्याचे इतरांनी ही अनुकरण करावे आणि आपणही अश्या संकटग्रस्तांना सढळ हाताने,निस्वार्थ भावनेने मदत करावी.सहकार्य करावे.ह्या एका पवित्र उद्देशाने आणि कांही प्रतिष्ठित जेष्ठ नागरिकांच्या अग्रहास्तव..आम्ही कांही ठराविक ठिकाणचे समाजसेवा करतानांचे फोटो काढले.ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.आमच्या समाजसेवा कार्याचे ते फोटो व लेख पाहून सदर आमच्या ह्या पवित्र निस्वार्थ कार्याची आपल्या संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर कर्नाटक,राजस्थान,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,पंजाब,गुजरात,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,हरियाणा, केरळ,ओरिसा व बिहार अश्या इतर कित्येक राज्यांनी आप-आपल्या राज्यातील व देशपातळीवरील बऱ्याच सरकारी निमसरकारी,सहकारी,खाजगी संस्था यांनी आपल्या..'हिंदरत्न' जीवरक्षक मानव.सांगली.(महाराष्ट्र) या संस्थेची व माझ्या निस्वार्थ समाज सेवा कार्याची मनापासून दखल घेतली.संस्थेसह संस्थापक,अध्यक्ष या नात्याने माझा आतापर्यंत विविध सरकारी निमसरकारी,सहकारी व खाजगी संस्थांनी 'कोरोना योद्धा' किंवा 'कोविड १९' हे मानाचे २०३ पेक्षा जास्त 'सन्मानपत्र' व ३६ अत्युच्च मानाचे पुरस्कार देऊन माझा व माझ्या सेवाभावी संस्थेचा सन्मान केला आहे..गौरव केला आहे.राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी ग्लोबल पिस अवॉर्ड २०२०,
डॉ.आंबेडकर सेवा सन्मान पुरस्कार,
मदर टेरेसा वर्ल्ड पिस अवॉर्ड २०२०,
नॅशनल इंडियन आयकॉन अवॉर्ड २०२०,
मदर टेरेसा समाजसेवा पुरस्कार २०२०,
डॉ, ए. पी.जे.अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड २०२०, इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड २०२०,
अटल सेवा सन्मान पुरस्कार,
मानवतेचा दीप स्तंभ पुरस्कार २०२०,
एक्सलेन्स अवॉर्ड २०२०,सेवा योद्धा अवॉर्ड,
साध्वी विभा मुनी योगा रत्न अवॉर्ड,कर्मवीर पुरस्कार
हे अत्युच्च मानाचे अलौकिक पुरस्कार मिळाले आहेत.
सुवर्ण अक्षरांत नोंद करण्यात यावी अशी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आपणा सर्वांना सांगण्याचा आम्हांला अत्यानंद होत आहे.ह्या आनंदात आपणं सर्वांनी सामील व्हावे.आपणं सुद्धा ह्या सन्मानाचे,सन्मानपत्रांचे व पुरस्कारांचे तितकेच हक्कदार आहात.मानाचे मानकरी आहात.आपल्या विना माझी समाजसेवा शून्य आहे.आपल्या आशीर्वाद व प्रेरणेतूनच आम्ही आज समाज सेवेच पवित्र कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडत आहे.
सुवर्ण अक्षरांत नोंद करण्यात यावी अशी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आपणा सर्वांना सांगण्याचा आम्हांला अत्यानंद होत आहे.ह्या आनंदात आपणं सर्वांनी सामील व्हावे.आपणं सुद्धा ह्या सन्मानाचे,सन्मानपत्रांचे व पुरस्कारांचे तितकेच हक्कदार आहात.मानाचे मानकरी आहात.आपल्या विना माझी समाजसेवा शून्य आहे.आपल्या आशीर्वाद व प्रेरणेतूनच आम्ही आज समाज सेवेच पवित्र कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडत असतांना
आपल्या देशातील कित्येक राष्ट्रीयकृत संस्थांनी माझ्या कार्याची देशपातळीवर दखल घेऊन कित्येक संस्थेनी मला अत्युच्च मानाचे पद देण्याचा सपाटा लावला असतांना
भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा रजि.नं.122/2018-19 ह्या राष्ट्रीयकृत संस्थेने माझ्या निस्वार्थ समाजसेवा कार्याची माझ्यातील सुप्त गुणांची दखल घेऊन मला सन्मानपत्र सोबत भारतीय महिलांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचारस न्याय देण्यासाठी..माझी महाराष्ट्र राज्य प्रबंधक पदावर नियुक्ती केली.आपल्या माय-बहिणीचं आणि लेकींच संरक्षण करण्याचं बळ दिल. मी ही माझ्या पदाशी एकनिष्ठ राहून तसेच शासन,प्रशासन आणि भारतीय संविधानच्या नियमाधीन राहून मी आपल्या समस्त भारतीय माय बहिणींच आणि लेकींच माझ्या परीने संरक्षण करेन.त्यांचं विविध माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध राहीन.एक खारीचा वाटा म्हणून समाजातील कित्येक महीलांसाठी शासकीय पातळीवरील बचत गट माध्यमातून उद्योग निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा सतत प्रयत्न करेन.समाजातील अत्यंत गोरगरीब लेकींच्या विवाह आणि शिक्षणासाठी प्रामुख्याने मदतीचा आधार देण्याचं कर्तव्य पार पाडीन. वैधकीय दृष्ट्या महिलांना सर्वोपतरी मदत करून त्यांच्या दुखत सहभागी होईन.त्यासोबत गोरगरीब,दलित,वंचित, निराधार,अनाथ आणि भटके भिकारी लोक यांचेसाठी अन्नदान करून त्यांची थोडीशी भूक भागविणे,विविध ऋतीतीलअत्यावश्यक वस्त्रदान करणे तसेच रक्तदान, नेत्रदान आणि देहदान सारखे राष्ट्रीय संकल्प राबविणे,ब नेचरपेथी आणि योगविद्या,प्राणायाम,ध्यानधारणा आणि व्यसनमुक्ती इन्स्टिटय़ूट उभा करून जन आरोग्य सेवा करण्यास प्राधान्य देणे.'एक मुलगी एक झाड' ह्या माझ्या संकल्पनेतून सामाजिक वनीकरण कार्यक्रमात सहभाग घेऊन वनिकरणाचे महत्व पटवून देणे.हरितक्रांती साठी जनजागृती करणे,स्वच्छता मोहीम राबविणे,वृद्ध मायबापांचे साठी आश्रम शाळा उभा करणे,वयाची झीरो ते अठरा वर्षांपर्यंत अनाथ आश्रमात राहून बाहेर पडलेल्या, स्वतःच अस्तित्व शोधणाऱ्या मुलामुलींना माझं स्वतःच नांव देऊन त्यांचं पालकत्व स्वीकारणे,त्यांचं संगोपन करणे. त्यांच्या आयुष्याच्या दिशा बदलणे व त्यांची सर्व स्वप्ने सत्यात उतरविणे,गरीब विद्यार्थ्यांच्या साठी पुस्तक पेढी, MPSC आणि UPSC धर्तीवर अभ्यासिका उपलब्ध करून देणे.विधवा व परितक्त्या महिलांचं पुनर्वसन करणे,होतकरू गरीब खेळाडूंना त्यांच्यातील सुप्त खेळाडूला प्रोत्साहन देणे. त्यांच्यासाठी मूलभूत निधी अथवा त्यांना खेळांचे साहित्य उपलब्ध करून देणे.असे कित्येक प्रकल्पात मी या ना त्या कारणाने खारीच्या वाटेने,मी माझ कांही अंशी विना प्रसिध्दी करता योगदान दिले आहे.माझ्या संकल्पनेतली हीच माझी स्वप्ने आणि उधिष्टे यापेक्षाही मोठी करण्याचा माझा मानस आहे.आणि ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार आहे.वचनबद्ध आहे.
त्यासाठी आपल्या अनमोल मार्गदर्शनाची,सहकार्याची, आपल्या अखंड खंबिर साथीची..आणि पाठबळाची मला अत्यंत आवश्यकता आहे.गरज आहे..ती मला आपण मोठ्या मनाने आपण द्याल यात शंकाच नाही.
पत्रकार परिषदेस मुख्य आयोजक महाराष्ट्र राज्य प्रबंधक मा.हिंदरत्न दिपक लोंढे,अध्यक्ष स्थानी समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रा.अमोल महापुरे,प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे मा.अशोकभाऊ पाटील-कोकळेकर,अग्रणी प्रतिष्ठानचे मा.प्रतीक पाटील,साई,साकार आणि सनराईज डेव्हलपर्सचे मा.विवेक पाटील,प्रमुख उपस्थिती कोल्हापूर बार असोसिएशनचे वकील श्री.अनिल भाले,प्रा.बबन पाटोळे,मा.संभाजी केंचे,राष्ट्रीय खेळाडू आर्यदिप लोंढे,आणि सौ.शारदा लोंढे यांची होती.कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन श्री.विनय नांदे,श्री हणमंत शिंगाडे आणि श्री.सुनील लवटे यांनी केले.कार्यक्रम ची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य प्रबंधक श्री.हिंदरत्न दिपक लोंढे यांनी केली आणि मान्यवरांचे अभार विधी सल्लागार सनी साळुंके यांनी मानले.