शेमारू मराठीबाणा’ स्वप्नीलला वाढदिवशी देणार अनोखी भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


‘शेमारू मराठीबाणा’ स्वप्नीलला वाढदिवशी देणार अनोखी भेट


चित्रपट पहायला कुणाला नाही आवडतं? चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण लॉकडाऊनमुळे सध्या ते शक्य नाही. त्यामुळे घरबसल्या हा आनंद घ्यायची संधी उपलब्ध करून देत ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने ऑक्टोबर महिन्यात ‘खिचिक’ व ‘भिकारी’ या दोन वेगळ्या जॉनरच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.


एका फोटोचा शोधप्रवास दाखवतानाच नात्यांची अनोखी गुंफण दाखवणाऱ्या ‘खिचिक’ या कौटुंबिक चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरचा आस्वाद रविवार ११ ऑक्टोबरला दुपारी १२.०० वा व सायं ६.०० वा.प्रेक्षकांना घेता येणार आहे. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, अनिल धकाते, सुदेश बेरी या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘खिचिक’ चित्रपटातून नाट्य व विनोदाची छटा अनुभवायला मिळेल. या अनुभवाविषयी बोलताना सिद्धार्थ जाधवने सांगितलं, ‘खिचिक’ ही आजोबा आणि नातवाच्या नात्याची हृद्यस्पर्शी गोष्ट आहे. त्यातली माझी ‘मिथुन’ ही व्यक्तिरेखा लांबीने कमी असली तरी वेगळी व धमाल होती. ती मला आवडली. एका सुंदर कथेचा मला भाग होता आलं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. ‘खिचिक’ माझ्यासाठी अतिशय गोड अनुभव होता.


१८ ऑक्टोबरला मराठी चित्रपटसृष्टीतला स्टार अभिनेता स्वप्नील जोशी याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या ‘भिकारी’ या महामूव्हीची मेजवानी रविवार १८ ऑक्टोबर दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० घेता येईल. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या स्वप्नील जोशी अभिनीत ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील सह सयाजी शिंदे, मिलिंद गुणाजी, ऋचा इनामदार हे कलाकार पहायला मिळतील.