जगात २.९० कोटी महिला आजही गुलामगिरीत;

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



संयुक्त राष्ट्रे : जगात कर्ज, जबरदस्तीने विवाह, वेठबिगारी, घरगुती दास्यत्व या माध्यमातून २.९० कोटी महिला आधुनिक गुलामगिरीच्या जोखडात अडकल्या आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे. ‘वॉक फ्री अँटी स्लॅव्हरी’ या संघटनेच्या सहसंस्थापक ग्रेस फॉरेस्ट यांनी सांगितले, की दर १३० महिला व मुली यांच्यापैकी १ महिला किंवा मुलगी ही आधुनिक गुलामगिरीत आहे. याचा अर्थ ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक महिला आधुनिक गुलामगिरीच्या यातना भोगत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की मानवी इतिहासात कधी नव्हे इतके लोक आज गुलामगिरीत आहेत, हे वास्तव आहे. वॉक फ्री, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना यांनी मिळून गुलामगिरीबाबत अहवाल तयार केला आहे. महिलांना गुलामगिरीचा फटका अधिक बसत आहे. ९९ टक्के महिला या लैंगिक छळवणूक, ८४ टक्के जबरी विवाह, ५८ टक्के वेठबिगारी याच्या बळी ठरल्या आहेत. कोविड १९ साथीमुळे आधुनिक गुलामगिरीत भर पडली असून आणखी लोक त्यात ढकलले गेले आहेत. या काळात जबरी विवाह व बालविवाह यांचे प्रमाण वाढले, तसेच कामाच्या ठिकाणी पिळवणूक वाढली. १३६ देशांत बालविवाह व बाल वेठबिगारी हा गुन्हा ठरवला गेलेला नाही. वस्तू पुरवठा साखळ्यांमध्ये महिलांची पिळवणूक होत असून कपडे, कॉफी, तंत्रज्ञान उद्योगातही महिलांना गुलामगिरीचा सामना करावा लागत आहे.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या