होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध वाटप उपक्रमाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



पुणे : माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होम क्वारंटाईन आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या औषधे किट वाटप सुरुवात झाली. या औषधांच्या किटमध्ये १५ दिवसांचे डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या आहेत. जवळपास औषधांच्या ५००० किटचे वाटप केले जाणार आहे. यंदाचा नवरात्र महोत्सव टाळून आशापुरा मंदिराच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, माँ आशापुरा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, इंदर छाजेड, मंगेश कटारिया, हेमंत रायसोनी, अशोक भंडारी, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे अध्यक्ष लायन्स ज्योतिकुमार अगरवाल, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरचे अविनाश शहाणे, सामाजिक सेवा उपक्रम प्रमुख राजेंद्र गोयल, समन्वयक शाम खंडेलवाल आदी उपस्थित