नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावचे पुनर्वसन साठी मा. आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावचे पुनर्वसन साठी मा. आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे* 


रायगड :- मुळ शेवा व कोळीवाडा ही दोन्ही गावे जे.एन.पी.टी. बंदराच्या प्रकल्पासाठी १९८६ साली विस्थापित केली असून महाराष्ट्र शासनाने कोकण आयुक्त व जिल्हाअधिकारी रायगड यांच्या मार्फत दोन्ही गावांचे पुनर्वसन केले. नवीन शेवा गावाचे पुनर्वसन बोकडविरा गावाजवळ केले व हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन बोरी-पाखाडी या ठिकाणी केले. आजपर्यंत ३४ वर्षात सतत जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, जे.एन.पी.टी. चेअरमन यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार, आंदोलने-उपोषणे केलेले आहेत. तरी सुद्धा या दोन्ही गावांचा पुनर्वसानाचा प्रश्न सुटला नाही.


शेवटी *माजी आमदार श्री.मनोहरशेठ भोईर* यांनी *महाराष्ट्र राज्याचे मान.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब*, व *मान.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब* व संबधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांच्याकडे सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्राद्वारे साकडे घातले आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रालयात या प्रश्नावर बैठक बोलाविण्यात येईल असे संबधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.